Wednesday, April 24, 2024
Homeनगरडिसेंबर महिन्यांत मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम

डिसेंबर महिन्यांत मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात डिसेंबर महिन्यांत मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

- Advertisement -

भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत 17 नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी जाहीर करण्यात आली असून दिनांक 15 डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत.

अधिकाधिक नवमतदारांनी त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करावे यासाठी डिसेंबर महिन्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. ही विशेष मोहीम दिनांक 05 व 06 डिसेंबर आणि दिनांक 12 व 13 डिसेंबर राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनीही सहभागी होऊन या मोहिमेसाठी मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ता (बूथ लेवल एजंट) यांची नेमणूक करावी, असे आवाहन करण्यात आले आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या