Wednesday, April 24, 2024
Homeनगरडेक्कन ओडिसी ट्रेन आता शिर्डीहून धावली पाहिजे

डेक्कन ओडिसी ट्रेन आता शिर्डीहून धावली पाहिजे

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

भारतातील प्रसिद्ध शाही रेल्वेपैकी एक असणारी डेक्कन ओडिसी ट्रेन आता पुन्हा ट्रॅकवर धावण्यास सज्ज झाली असून टूर ऑपरेटरसाठी डेक्कन ओडिसीच्या काढलेल्या जागतिक निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 15 जानेवारीपर्यंत प्रवासाची तारीख निश्चित होणार आहे. त्या दृष्टीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने(एमटीडीसी) तयारी देखील सुरू केली आहे. त्यामुळे डेक्कन ओडिसी ही खास पर्यटनाला वाहिलेली रेल्वे शिर्डीलाही आली पाहिजे. यासाठी शिर्डीकरांनी प्रयत्न केले तर शिर्डीच्या व्यवसायाला चालना मिळू शकते यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी शहरात दळणवळणाची साधने उपलब्ध करुन घेतली आहे. यामध्ये विमानसेवा, रेल्वेसेवा यांचा प्रामुख्याने समावेश आहे.रेल्वेच्या माध्यमातून वर्षाकाठी लाखो भाविक साईदरबारी हजेरी लावत असतात तर येथील विमानतळ कमी कालावधीत सर्वात वेगवान ठरले आहे. शिर्डी पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त शहर म्हणून नावारूपास येत आहे.महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पर्यटनाला वाहीलेली ओडिसी डेक्कन रेल्वे शिर्डीलाही आली पाहिजे यासाठी आता शिर्डीकरांनी सामुहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. डेक्कन ओडीसीमुळे शिर्डी शहराच्या पर्यटनाला चालना मिळेल आणी येथील अर्थचक्राचे रुतलेले चाक वेगाने फिरू लागेल.

डेक्कन ओडिसी रेल्वेचा येथील विमानसेवेला फायदा होईल.त्यामुळे येथील हॉटेल इंडस्ट्रीज पुन्हा एकदा नव्या जोमाने उर्जितावस्थेत येईल. परिसरातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल. मात्र सध्या देशावर करोनाच्या ‘ओमायक्रॉन’चे संकट टळले तर फेब्रुवारीमध्ये पर्यटकांना डेक्कन ओडिसीतून महाराष्ट्राचे सौंदर्य पाहता येणार आहे. डेक्कन ओडिसीचे प्रवासी हे विशेषतः परदेशी पर्यटक असतात. अनेक दिवस आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्याने ते भारतात येऊ शकले नाहीये. परंतु आता करोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने परदेशी पर्यटक भारतात पर्यटनासाठी येत आहे. विशेषतः भारतात डिसेंबर व जानेवारी हा पर्यटकांच्या दृष्टीने पर्यटनास उत्तम कालावधी असल्याने याच काळात देशांत मोठ्या टूर्स काढल्या जातात.

त्यामुळे आता डेक्कन ओडिसीची सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी एमटीडीसी प्रयत्नशील आहे. डिसेंबर अखेरपर्यंत निविदांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर असून 15 जानेवारीपर्यंत डेक्कन ओडिसीचा महाराष्ट्रातला प्रवास सुरू करण्याची तारीख निश्चित होईल अशी अपेक्षा आहे. सन 2005 पासून डेक्कन ओडिसी धावत असून महाराष्ट्रात ही आठ दिवस व सात रात्र प्रवास करते. मुंबईतून प्रवासाला सुरुवात होते. यामध्ये नाशिक, औरंगाबाद, अजंठा, कोल्हापूर, गोवा, सिंधुदुर्ग असा प्रवास करीत पुन्हा मुंबईला प्रवासाचा शेवट होईल.यात जगप्रसिद्ध अजिंठा आणि एलोरा लेणीचा समावेश आहे.त्यामळे शिर्डीसाठी डेक्कन ओडिसी सुरू झाली पाहिजे, अशी मागणी जगभरातील साईभक्तांसह शिर्डी ग्रामस्थांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्य पर्यटनाच्या दृष्टीने जगाच्या नकाशावर यावे यासाठी शासनाच्या वतीने जे प्रयत्न सुरु आहेत त्यात डेक्कन ओडिसी या शाही रेल्वेतून होणारे महाराष्ट्र दर्शन हे अतिशय महत्वाचे आहे. जानेवारी महिन्यापासून डेक्कन ओडिसी रेल्वे सुरु होणार आहे ही शाही गाडी शिर्डी मार्गे जावी अशी आमची मागणी आहे.

– कमलाकर कोते, शिवसेना नेते

- Advertisment -

ताज्या बातम्या