नव्या संस्थांंना कर्ज वाटपाची चौकशी व्हावीः कदम

jalgaon-digital
3 Min Read

निफाड। प्रतिनिधी Niphad

निफाड तालुक्यात (niphad taluka) नविन सहकारी संस्था (New co-operative society) मंजूर करून त्यांना बेकायदेशीर कर्ज वाटप (Illegal loan allocation) केल्याने या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अन्यथा त्याबाबत तीव्र आंदोलन (agitation) छेडण्यात येईल असा इशारा माजी आमदार अनिल कदम (former mla anil kadam) यांनी विभागीय सहनिबंधक (Departmental Co-Registrar) नाशिक (nashik) यांना दिलेल्या निवेदनाद्वारे (memorandum) दिला आहे.

माजी आमदार अनिल कदम यांचेसह शिवसेना (shiv sena) पदाधिकार्‍यांनी या प्रश्नावर काल शुक्रवारी निफाड येथील सहाय्यक निबंधक कार्यालयावर धडक देत सहाय्यक निबंधकांना घेराव घालत त्यांना याप्रश्नी जाब विचारला. यावेळी माजी आमदार अनिल कदम यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नव्याने स्थापन झालेल्या विकास सोसायट्यांचे सभासद हे जुन्या सोसायट्यांचे सभासद आहे. त्यामुळे या संस्थेतील दुबार असलेल्या सभासदांची नावे कमी करणे आवश्यक आहे.

मात्र ही नावे कमी करण्यात आलेली नाही. तसेच नव्याने स्थापन झालेल्या विकास सहकारी संस्थांना (Development Cooperatives) बेकायदेशिर कर्ज वाटप करण्यात आले असून या प्रकरणाची देखील चौकशी होवून त्यांचेवर कायदेशिर कारवाई (Legal action) करण्यात यावी. तसेच ज्या विकास सहकारी संस्थांचे सचिव व संचालक मंडळ या कामात अडथळा अथवा कागदपत्र उपलब्ध करून देत नाही याबाबत संबंधितांवर आपले स्तरावरून कार्यवाही करण्यात यावी.

तसेच नव्याने स्थापन झालेल्या सर्व सातही संस्थांबाबत कारवाई करण्यात यावी अन्यथा निफाड तालुका (niphad taluka) शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन (agitation) छेडण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील असेही निवेदनात (memorandum) कळविले असून

या निवेदनाच्या प्रति सहाय्यक निबंधक सहकारी संस्था निफाड, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Co-operation Minister Balasaheb Patil), मा.आयुक्त सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे (Commissioner Co-operative Election Authority Maharashtra State Pune), विभागीय सहनिबंधक सह संस्था नाशिक, जिल्हा उपनिबंधक सह संस्था नाशिक, पोलीस निरीक्षक निफाड यांना देण्यात आल्या आहे.

अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करू नये : कराड

तालुक्यात नव्याने स्थापन झालेल्या सात विकास सहकारी संस्थांची (Development Cooperatives) नोंदणी 31/3/2021 रोजी करण्यात आलेली असून नव्याने स्थापन झालेल्या सात विकास सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात यापूर्वी कार्यरत असलेल्या विकास सहकारी संस्थांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यामुळे या विकास सहकारी संस्थांच्या प्रसिद्ध झालेल्या यादीवर हरकती घेण्यात आलेल्या आहेत.

एकाच गावात नव्याने स्थापन झालेल्या संस्थेचा सभासद हा अन्य संस्थेत सभासद असल्यास त्याने त्याचेकडील कर्जाचा भरणा करून सभासदत्वाचा राजीनामा देणे आवश्यक आहे. मात्र नव्याने नोंदणी झालेल्या विकास सोसायटीत व जुनी विकास सोसायटीत सभासदांची दुबार नावे आहेत.

ती कायद्याने कमी करणे आवश्यक असल्याने दि.4.2.2022 रोजी होणारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येवू नये अन्यथा निफाड येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात आत्मदहन करण्यात येईल व अशा वेळी होणार्‍या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी सहाय्यक निबंधक कार्यालयावर राहील असेही शिवसेना तालुका प्रमुख सुधीर कराड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *