Wednesday, April 24, 2024
Homeनंदुरबारकोविडमुळे झालेल्या मृत्यूंचे लेखा परिक्षण करावे

कोविडमुळे झालेल्या मृत्यूंचे लेखा परिक्षण करावे

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

जिल्हयात यावर्षी एप्रिल, मे व जून महिन्यात (Covid-19) कोविड १९ तसेच इतर आजारांनी झालेल्या मृत्यूंचे लेखा परिक्षण करण्यात यावे, दोषी आढळणार्‍या रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी टायगर सेनेतर्फे करण्यात आली आहे.

- Advertisement -

याबाबत आदिवासी टायगर सेनेतर्फे (Collector) जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हयात कोविड १९ तसेच इतर आजारांनी एप्रिल, मे व जून म हिन्यात मोठया प्रमाणावर मृत्यू झाले आहेत.

मृत्यू झालेल्या रुग्णांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले असून उपचारादरम्यान काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परंतू भितीपोटी रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाकडे कोणतीही तक्रार केलेली नाही.

या खाजगी रुग्णालयांनी मृत्यू झालेल्या, रुग्णांवर केलेले उपचार, आकारलेल्या अतिरिक्त देयकांबाबत तपासणी होणे आवश्यक आहे. काही रुग्णालयांनी कोविड रुग्णालय म्हणून मान्यता नसतांना उपचार केले आहेत.

याबाबत दखल घेवून जिल्हयातील सर्व संबंधीत रुग्णालयांची चौकशी करण्यात यावी व दोषी आढळणार्‍या रुग्णालयांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर आदिवासी टायगर सेनेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ.सारीका मोरे यांची सही आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या