Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशबेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू

बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू

दिल्ली | Delhi

पश्चिम बंगालमधील पुर्व मिदनापूर जिल्हातील ईग्रा मध्ये फटाक्यांच्या फॅक्ट्रीत (Explosion in Cracker Factory) झालेल्या भीषण स्फोटात ९ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, या कारखान्यात अवैधरित्या फटाके बनवण्याचे काम केले जात होता. या कारखान्यात झालेल्या स्फोटात ९ लोकांनी जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी सांगितले की, स्फोटानंतर कारखान्याची इमारत कोसळली तसेच मृतदेह छिन्नविछिन्न होऊन जवळच्या तलावात पडले होते. पोलीस स्फोटाच्या कारणाचा तपास करत आहे.

Mumbai Fire : मुंबईत झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल

मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास हा स्फोट झाल्याचे समजते. या स्फोटाची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या नऊ गाड्यांच्या सहाय्याने आग विझवण्यात आली.

दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक अमरनाथ यांनी घटनास्थळी भेट दिली असून, त्या भागातील आयसीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र स्थानिक नागरिक पोलिसांच्या कारवाईवर नाराज असून त्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

Cyclone Mocha : मोचा चक्रीवादळाचा तडाखा; आतापर्यंत ८१ लोकांचा मृत्यू, १०० हून अधिक बेपत्ता

वरिष्ठ भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे (एनआयए) केली जावी अशी मागणी केली. तर अशा चौकशीला काहीच हरकत नाही मात्र सीआयडीने तपास आधीच सुरू केला असल्याचे मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.

या कारखान्याच्या मालकाला गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. मंगळवारच्या स्फोटानंतर तो शेजारील ओदिशामध्ये पळून गेल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या स्फोटाचा परिणाम इतका मोठा होता की, हा कारखाना असलेली इमारत पूर्ण कोसळली अशी माहिती पोलिसांनी दिली. हा कारखाना एका निवासी इमारतीमध्ये सुरू होता.

…अन् ‘बिग बी’ अमिताभ बच्चन चाहत्याकडून लिफ्ट घेत शुटींगला पोहोचले

- Advertisment -

ताज्या बातम्या