Thursday, April 25, 2024
Homeनगरवर्कशॉपमध्ये घुसून जिवे मारण्याची धमकी

वर्कशॉपमध्ये घुसून जिवे मारण्याची धमकी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोडवरील ओबेरॉय पेट्रोल पंपासमोर वर्कशॉपमध्ये अनाधिकाराने घुसून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली तसेच ताब्यातील गाळ्यात जाण्यास प्रतिबंध केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोडवरील ओबेरॉय पेट्रोल पंपासमोर वा. नं. 3, सर्वे 1370-अ/8 मध्ये वर्कशॉपमध्ये अनिल दगडू थोरात, (वय 57, धंदा-शेती, रा. थोरात मामा कॉम्प्लेक्स, वा.नं. 4, श्रीरामपूर) हे बसलेले असताना दुपारी 4 च्या सुमारास अत्तार आडनावाचे तिघेजण आले व थोरात यांच्या वर्कशॉपमध्ये अनाधिकाराने घुसून सदरचा प्लॉट नं. 1079, क्षेत्र 505 चौ. मी. पैकी 93 चौ. मी.चे मिळकत असलेल्या गाळ्याचे कुलूप आम्ही तोडून घुसत आहोत, काय करायचे ते तू करून घे. माझ्या नादी लागला तर तुझा कायमचा काटा काढीन, असे म्हणत शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली व मला मिळालेल्या ताब्यातील गाळ्यात जाण्यास आरोपींनी प्रतिबंध केला अशी फिर्याद अनिल दगडू थोरात यांनी श्रीरामपूर शहर पोलिसात दिली.

या फिर्यादीवरून इसाक हुसेन अत्तार, अलिम इसाक अत्तार, आसीक इसाक अत्तार, सर्व (रा. वा. नं. 2, श्रीरामपूर) यांच्याविरूद्ध भादंवि कलम 452, 324, 341, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी भेट दिली. अलिम इसाक अत्तार याला अटक करण्यात आली असून पसार दोघांचा शोध पो.नि. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक पाटील घेत आहेत. यावेळी संगमनेररोडवर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या