Thursday, April 25, 2024
Homeजळगावसामूहिक अत्याचार करून तरुणीला विष पाजले

सामूहिक अत्याचार करून तरुणीला विष पाजले

पारोळा – Parola :

तालुक्यातील टोळी येथे 20 वर्षीय तरुणीवर तीन तरुणांनी अत्याचार करत विष पाजून तिचा खून केल्याचा आरोप मृत तरूणीच्या नातेवाईकांनी तसेच मामाने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत केला आहे.

- Advertisement -

या प्रकरणी सर्वत्र खळबळ माजली असून नातेवाईक व सामाजिक संघटनेने घटनेची सीआयडी चौकशीची मागणी केली आहे तर दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली असून मुख्य संशयितावर धुळे येथे उपचार सुरु आहेत. एका संशयितास पोलीसांनी शिंदखेडा येथून ताब्यात घेतले.

याबाबत 20 वर्षीय पिडीता ही एस.वाय.बी.एस्सी.चे शिक्षण येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय येथे घेत होती.

तिच्या वडिलांचे निधन झाले असून ती आपली आई, दोन बहिणी, दोन भाऊ यांच्यासोबत टोळी येथे राहत होती. दि.7 रोजी ती मामाकडे दिवाळीसाठी पारोळा येथे आली होती.

कामानिमित्त मामा सकाळी घराबाहेर गेले तेव्हा पीडित लहान भावाला मेडिकलवरून औषधी आणण्यासाठी जाते असे सांगून गेली असता परत न आल्याने मामाने शोधाशोध केली असता मिळून आली नाही, म्हणून पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

दि.8 रोजी पीडित तरुणी लहान राम मंदिर परिसरात मैदानावर खेळणार्‍या काही तरुणांना दिसली. त्यांनी तिला कुटिर रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर प्राथमिक उपचारासाठी धुळे येथे नेत असताना गाडीत शुद्धीवर आली आणि तिने सर्व घटना मामा व बहीणीला सांगितली.

मारहाण करणार्‍या महिलेचे गुढ कायम

पीडित तरुणीने मृत्युपूर्व दिलेल्या जबानीत आपल्या मामा व बहिणीला दिलेल्या माहितीत तीन पुरुष संशयितांसह एका महिलेचा उल्लेख केला होता.

परंतु तिचे नाव अद्याप स्पष्ट झाले नसून एकूण चार संशयितांपैकी दोन पोलिसांच्या ताब्यात असले तरी एक पुरुष व महिला मात्र फरार आहेत.

या घटनेनंतर संध्याकाळी 4 वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी पारोळा येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली व संशयितांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिलेत.

याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात मृत तरुणीच्या मामाने टोळी येथील शिवनंदन शालीक पवार, पप्पू अशोक पाटील, अशोक वालजी पाटील व एक अनोळखी महिला या चार जणांविरुद्ध भाग पाच गु.र.नं. 206/ 2020 भादंवि कलम 363, 365, 328, 376, ( ड) 302, 323, 504, 506, 34, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम 3(2) र्(ीं-)9 (ु) (!) (!!) प्रमाणे संगनमताने जीवे ठार मारण्याची धमकी, अपहरण, बलात्कार, विष पाजून ठार मारणे, जातीवाचक शिवीगाळ याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास डी वाय एस पी राकेश जाधव हे करीत आहेत.

या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक डा.प्रवीण मुंडे हे 5.30 वाजेपासून रात्री उशिरापर्यंत पारोळा पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते. तसेच चाळीसगाव विभागीय पोलिस उपअधीक्षक सचिन गोरे हे देखील पारोळा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत उपस्थित होत.े

यावेळी रात्री तिसर्‍या संशयितास सिंदखेडा येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर मुख्य संशयित शिवनंदन शालीक पवार याने काल विषारी औषध सेवन केल्याने धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असल्याने त्याचेवर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

तर पप्पू अशोक पाटील, अशोक वालजी पाटील हे हे पोलिसांच्या ताब्यात असून महिला संशयिताच्या शोधार्थ पोलिस पथक पाठविण्यात आल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. अटक केलेल्या दोन संशयितांची पोलीस अधीक्षक डॉ.मुंडे यांनी चौकशी केली.

पो.नि.लीलाधर कानडे, स.पो.नि.रवींद्र बागुल, नीलेश गायकवाड, सुदर्शन दातीर यासह पोलीस कर्मचारी यांनी धुळे येथे जाऊन पीडितेचे इन कॅमेरा फॉरेन्सिक लॅबमध्ये शवविच्छेदन करून शव टोळी येथे आणून रात्री उशिरा तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दलित विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार केला आहे या गुन्ह्यात अजून संशयित असण्याची शक्यता असून त्यांना पोलिसांनी शोधले पाहिजे, या घृणास्पद घटनेबाबत महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने दि.11 रोजी सकाळी 11 वाजता निवेदन देण्यात येणार आहे.

या घटनेचा तीव्र निषेध करीत आहोत. सर्व संशयितांना अटक करीत नाही तोपर्यंत पीडित मुलीचे अंत्यसंस्कार करणार नाहीत तसेच हा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात देऊन सीआयडी चौकशी करण्यात यावी व शासनाने या कुटुंबाचे पुनर्वसन केले पाहिजे व संशयितांना कठोर शासन व्हायला पाहिजे, असे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांनी केली आहे.

जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून पुरावा नष्ट करण्याचा नराधमांचा इरादा होता. शासनाने व पोलिसांनी नराधमांना तात्काळ अटक करून फाशी द्यावी, अटक केली नाही तर बहिणीची अंत्ययात्रा काढणार नाही, आंदोलन करू, बहिणीला न्याय मिळाला पाहिजे, असे अत्याचरीत तरूणीच्या बहीणीने सांगितले.

भाचीवर झालेला अत्याचार आहे, तिचे वडील मृत असून आई मोलमजुरी करते भाचा-भाची घरी एकटे साधून तिला गुंगीचे औषध देऊन तिला अज्ञातस्थळी नेऊन क्रूर पद्धतीने सामूहिक अत्याचार केला त्या तीन नराधमांसह एक महिला यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी मृत तरुणीच्या मामाने केली आहे.

पीडित तरुणीचा धुळ्यात उपचारादरम्यान मृत्यू

पारोळा तालुक्यातील टोळी येथील 20 वर्षीय तरूणीवर चौघांनी अत्याचार केला. त्यानंतर तिला विष देवून फेवून देण्यात आले. दुसर्‍या दिवशी ती जुलुमपुरा येथील लालबागच्या मळ्यात बेशुध्दावस्थेत आढळून आली.

तिला दि. 8 रोजी धुळे येथे उपचारासाठी नेत असतांना फपागणे गावाजवळ शुध्द आली. तेव्हा तिने झालेला प्रकार सांगितले.

तिला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तीन दिवसांपासून ती मृत्यूशी झुंज देत होती. अखेर आज दि. 10 रोजी पहाटे तिची प्राणज्योत मालवली.

- Advertisment -

ताज्या बातम्या