Thursday, April 25, 2024
Homeनगरखेळाडूचा मृत्यू, सहा जणांविरूद्ध गुन्हा

खेळाडूचा मृत्यू, सहा जणांविरूद्ध गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राहत्या घरात विजेचा धक्का बसून 31 ऑगस्ट रोजी खेळाडू अजिंक्य गायकवाड याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी महावितरण कंपनीचे अधिकारी, टिव्ही केबल सर्व्हिसचे मालक, कर्मचारी व पुरवठादार कंपनी अशा सहा जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मयत अजिंक्य याचे वडिल सुरेश किसनराव गायकवाड (रा. साईनगर, बुरूडगाव रोड) यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

पोलिसांनी टीव्ही केबल सर्व्हिसच्या मालक वनिता अनिल बोरा, त्यांचा मुलगा पीयूष अनिल बोरा (दोघे रा. विनायकनगर) खांबावर वीजवाहक तारा चढविणारे कर्मचारी, महावितरण कंपनीचे ज्युनिअर इंजिनिअर, पीयूष बोरा यांना केबल कनेक्शन पुरविणारे अहमदनगर जिल्ह्याचे पुरवठादार, टीव्ही केबल पुरवठादार कंपनी अशा एकूण सहा जणांविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.

31 ऑगस्ट रोजी अजिंक्य हा टीव्ही पाहत होता. याचवेळी खिडकीजवळ असलेल्या टीव्हीच्या केबलमधून चूरचूर असा आवाज आल्याने काय झाले आहे ते पाहण्यासाठी गेला असता अजिंक्य याचा खिडकीच्या गे्रनाईटला हात लागला तेव्हा त्याला धक्का बसला. या घटनेत अजिंक्य याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना सोबत घेऊन तपासणी केली तेव्हा गायकवाड यांच्या घरात आलेली टीव्ही केबल ही महावितरणच्या वीजवाहक तारावरून टाकलेली होती. केबल तारांमध्ये घुसून त्यात वीजप्रवाह आलेला होता. याच केबलमध्ये वीजप्रवाह उतरून अजिंक्य याचा मृत्यू झाल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर कलम 304 अ कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार एम. आर. शिंदे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या