Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकजायखेडा पोलीस ठाण्यातील मृत्युची चौकशी

जायखेडा पोलीस ठाण्यातील मृत्युची चौकशी

नाशिक । Nashik

सटाणा तालुक्यातील (Satana Taluka) जायखेडा पोलिस ठाण्यात (Jaikheda Police Station) आत्महत्या प्रकरणाची चौकशी (Suicide case investigation) करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सचिन पाटील (Superintendent of Police Sachin Patil) यांनी दिले आहेत. चौकशीचा अहवाल सोमवारपर्यंत सादर होणार असून. चौकशी अहवालानुसार पुढील कारवाई करणार असल्याचे पोलिस अधिक्षक पाटील यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

प्रकाश निकम (रा. आंबेडकरनगर, नामपुर) असे आत्मह्या करणार्‍याचे नाव आहे. त्यांची पत्नी राजनंदिनी निकम या विवाहीतेने शनिवारी आत्महत्या केली. विवाहीता व तिचा पती प्रकाश निकम नामपूरला (Nampur) मोल मजुरीचे काम करीत होते. एक मुलगा व मुलगी असलेल्या या चौघांच्या कुटुंबात शनिवारी कलह निर्माण झाला. त्यात राजनंदिनी हिने शुक्रवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Woen Suicide) केली.

परिसरातील नागरिकांनी व पोलिस कर्मचार्‍यांनी तिला नामपूर ग्रामीण रूग्णालयात दाखल (Nampur Rural Hospital) केले. ग्रामीण रुग्णालयात विवाहतीच्या माहेरकडील नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. पोलिसांनी जाबजबाब नोंदवण्याचे काम हाती घेतले. यावेळी काही जणांकडून प्रकाशवर दबाव टाकण्यात आला. आपल्या जीवाचे काही तरी बरे वाईट होईल, या भीतीने प्रकाश यांनी थेट जायखेडा पोलिस ठाणे (Saikheda Police Station) गाठले.

तिथे पोलिसांनी त्याची बाजू ऐकून त्यास कोठडीत थांबण्यास सांगितले. मात्र, रात्रीच्या सुमारास ठाणे अंमलदाराचे लक्ष नसताना प्रकाश निकम याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली. पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी लागलीच जायखेडा पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी प्रकाश यांच्या संतप्त नातेवाईकांनी केली. त्यानुसार पाटील यांनी जायखेडा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांकडे चौकशीची जबाबदारी सोपवली आहे. दरम्यान, हा कोठडीतील मृत्यू असल्याने या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग होणार आहे.

सत्य तपासले जाईल

प्रथमदर्शनी त्यास अटक करण्यात आलेली नव्हती. यामुळे पोलीस कर्मचार्‍यांचा दोष असण्याची शक्यता कमी आहे. परंतु पोलिस ठाण्यात आत्महत्याचा प्रकार असल्याने याची सविस्तर चौकशी होणे क्रमप्राप्त आहे. त्यात सीसीटीव्हीही तपासण्यात आलेले असून, प्राथमिक चौकशी अहवाल रविवारी सांयकाळपर्यंत अथवा सोमवारी मिळेल. यात काय तथ्य आढळून येतात त्यानुसार पुढील कारवाई होईल.

– सचिन पाटील, पोलीस अधीक्षक

- Advertisment -

ताज्या बातम्या