Thursday, April 25, 2024
Homeनगरशेवगावात मुंडके नसलेला महिलेचा व लहान मुलाचा मृतदेह आढळला

शेवगावात मुंडके नसलेला महिलेचा व लहान मुलाचा मृतदेह आढळला

शेवगाव ( तालुका प्रतिनिधी ) –

मुंडके नसलेला सुमारे 60 वर्षीय अनोळखी महिलेचा व एका 10 ते 15 वर्ष वयाच्या मुलाचा मृतदेह शेवगाव शहरातील आयटीआय शेजारील

- Advertisement -

मोकळ्या जागेत आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. मुंडके नसल्यामुळे ही हत्या की अन्य काही याचा शोध पोलीस दलाने सुरू केला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव पोलिस ठाण्यात कोणीतरी फोन करून माहिती दिली की, पाथर्डी रोडवर असलेल्या आय.टी.आय . लगत मोकळ्या जागेत एक महिला मृत्यूमुखी पडली आहे. ही माहिती समजताच शेवगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत ठाकरे, पो.ना. रविंद्र शेळके, सुधाकर दराडे, अच्यूत चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. या पोलीस पथकाने तेथे पाहणी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

पोलीसांनी पाहणी केली असता एक 60 वर्षीय महिला मृतावस्थेत आढळून आली. विशेष म्हणजे या मृतदेहाला मुंडकेच नव्हते. पोलिसांनी आसपास तपास केला मात्र मुंडके आढळून आले नाही. मात्र तेथे आणखी एक 10 ते 15 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला. त्याचपमाणे या महिलेल्या मृतदेहाशेजारी भांडी, पेटी, गोणपाट, काड्याकुड्या असे अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले.

मृतदेहाला मुंडके नसल्याने ओळख पटविणे अवघड बनले आहे. यामुळे पोलिसांनी नगर येथील श्वान पथकाला पाचारण केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या