Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकअभोणा : व्हॉलीबॉल स्पर्धेत डीसीसी संघ विजयी

अभोणा : व्हॉलीबॉल स्पर्धेत डीसीसी संघ विजयी

अभोणा । Abhone (वार्ताहर)

अभोणा क्रीडा मंडळ आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेत चुरशीच्या अंतिम सामन्यात कोपरगाव येथील संघाचा पराभव करत नाशिक येथील डी. सी. सी संघाने विजय मिळवला.

- Advertisement -

येथील क्रीडा मंडळाच्या मैदानावर दिवसरात्र झालेल्या स्पर्धेत चार गटातून नाशिक डी. सी. सी, कोपरगाव, युनिव्हर्सल व अभोणा क्रीडा मंडळाच्या संघाने प्रवेश केला होता.

नाशिक डी. सी. सी.ने अभोणा संघाचा पराभव केला तर कोपरगाव संघाने युनिव्हर्सल संघाचा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. चुरशीच्या अंतिम सामन्यात नाशिक डी. सी. सी.ने कोपरगाव संघाचा पराभव केला.

तिसर्‍या व चौथ्या पारितोषिकसाठी युनिव्हर्सल संघ व अभोणा संघ यात सामना झाला. त्यात युनिव्हर्सल संघाने सामना जिंकून तिसरे स्थान पटकावले तर अभोणा संघाला पराभवामुळे चौथे स्थान मिळाले.

स्पर्धेत उत्कृष्ट स्मॅशर युनिव्हर्सल संघाचा मयूर पानसरे व नाशिक डी. सी. सी. संघाचा शुभम श्रीवास्तव ऊर्फ स्वामी म्हणून यांची निवड झाली तर उत्कृष्ट लिफ्टर नाशिक डी. सी. सी. संघ आकाश परदेशी म्हणून यांची निवड करण्यात आली.

पारितोषिक वितरणाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा मंडळाचे अध्यक्ष किशोर शहा, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड, सचिन मुठे, धर्मेंद्र शहा, जितेंद्र मुठे, किरण सूर्यवंशी, पुष्कर कुलकर्णी, रितेश पवार, मयूर आहेरराव, संजय सोनवणे, सी. ए. गालिब मिर्झा, प्रीतम मोरे, उमेश दुसाने, हर्षल वेढणे आदी उपस्थित होते.

स्पर्धेत पंच म्हणून अजय कजगावकर, भूषण सूर्यवंशी, अजय तायडे, राहुल चव्हाण, बबलू मोरे आदींनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या