Thursday, April 25, 2024
Homeधुळेशिरपूरच्या डीबी पथकाने रोखली गुटखा तस्करी

शिरपूरच्या डीबी पथकाने रोखली गुटखा तस्करी

धुळे – कुरखळी । प्रतिनिधी dhule

इंदूरकडून (Indore) शिरपूरकडे (Shirpur) होणारी गुटख्याची (Gutkha) तस्करी शिरपूर शहर पोलिसाच्या (police) डीबी पथकाने सापळा लावून मोठ्या शिताफिने रोखली. मोबाईल टॉवर मालाच्या आड ही वाहतूक सुरू होती. 20 लाखांचा आयशर ट्रक व 24 लाखांची सुबंधीत तंबाखू असा 44 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालकाही अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

गुरुपुष्यामृत योग ; शेगावात भाविकांची गर्दी

इंदूर येथून शिरपूरकडे येणार्‍या आयसर ट्रकमधून (क्र.एच.आर.46/ ई.1969) राज्यात प्रतिबंधीत सुगंधी तंबाखुची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती काल दि.26 रोजी दुपारी शिरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ए.एस.आगरकर यांना मिळाली. त्यांनी तत्काळ डी.बी. पथकाला कारवाईचे आदेश दिले. डीबी पथकाने कळमसरे शिवारातील चोपडा फाट्यावर सापळा लावला. दुपारी साडेतीन वाजता संशयीत ट्रकला शिताफीने पकडले. वाहनावरील चालकाने त्याचे नाव अशोक आजादसिंग बडख (वय 34 रा.बाळंद ता.जि.रोहतक, हरियाणा) असे सांगितले. वाहनाची तपासणी केली असता त्यात मोबाईल टॉवर मालाच्या आडोशाला सुगंधीत तंबाखुने भरलल्या पांढर्‍या रंगाच्या पुठ्ठयाचे 40 खोके आढळून आले.

गुरुपुष्यामृत योग ; शेगावात भाविकांची गर्दी

20 लाखांचे वाहन व 24 लाख रूपये किंमतीची सुगंधीत तंबाखु असा एकूण 44 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बावीस्कर यांनी शिरपूर पोलिस ठाण्यात येवून वाहनातील मालाची तपासणी करून चौकशी अंती गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात ट्रक चालक अशोक बडख याला अटक करण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास पोउनि गणेश कुटे हे करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ए.एस. आगरकर, पोउनि गणेश कुटे, संदिप मुरकुटे तसेच डी.बी. पथकाचे पोहेकॉ ललीत पाटील, लादुराम चौधरी, पोना मनोज पाटील, पोकॉ विनोद आखडमल, योगेश दाभाडे, मुकेश पावरा, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, प्रविण गोसावी, सचिन वाघ, भटु साळुंके तसेच होमगार्ड मिथुन पवार, राम भिल, चेतन भावसार व शरद पारधी यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या