लसीकरणाचा भारताचा असाही जागतिक विक्रम

नवी दिल्ली

देशातील लसीकरणाला व्यापक स्वरुप प्राप्त करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार ‘योग दिना’चे औचित्य साधत लसीकरण मोहिमेला गती देण्यात आली. मोहिमेच्या नव्या टप्प्यात पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी देशात विक्रमी लसीकरणाची नोंद झाली आहे.देशात सोमवारी एकाच दिवसांत ८६ लाख १६ हजार ३७३ लाख लोकांनी लस घेतली. हा विश्वविक्रम आहे. कारण, आतापर्यंत जगातील कुठलाही देश एका दिवसात ५५ लाखांपेक्षा जास्त डोस देऊ शकला नाही. तथापि, चीन रोज दोन कोटी डोस देण्याचा दावा करतो, पण आंतरराष्ट्रीय समुदाय हा दावा खरा असल्याचे मानत नाही.

भुजबळ खुर्चीवर बसताच आंदोलक आक्रमक

विशेष म्हणजे लस घेणाऱ्यांत ७४ टक्के म्हणजे ६१.३ लाख लोक १८ ते ४४ वयोगटाचे आहेत. देशात आतापर्यंत रोज सरासरी ३१ लाख डोस दिले जात होते. सोमवारी त्याच्या दुप्पट डोस फक्त तरुणांना देण्यात आले. मध्य प्रदेश, कर्नाटक, यूपी, गुजरात आणि हरियाणा या ५ राज्यांत एकूण ४४ लाख म्हणजे देशाच्या ५२% डोस दिले.महाराष्ट्रात १८-४४ वयाेगटात साेमवारी एकूण ९१ हजार ५९६ जणांनी लस घेतली

केंद्र सरकार आता देशातील प्रत्येक नागरिकास मोफत लस देत आहे. मागील आठवडय़ातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत घोषणा केली होती. यापूर्वी राज्यांनाही लस खरेदी करण्यास सांगितले गेले होते. मात्र, आता केंद्र सरकार वैद्यकीय कंपन्यांकडून लसी खरेदी करून राज्यांना पुरवत आहे. सोमवारी सकाळपासूनच लसीकरण मोहीम जोरात सुरू झाली.

वेलडन इंडिया !

लसीकरणाबाबत पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे. “आजच्या रेकॉर्ड ब्रेकिंग लसीकरणाची संख्या आनंददायक आहे. कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी लस हे आपले सर्वात मजबूत शस्त्र राहिले आहे. ज्यांनी लसीकरण केले त्या सर्वांचे आणि तसेच सर्व नागरिकांनी लसीकरण केल्याची खात्री करून घेतलेल्या सर्व अग्रगण्य योद्धय़ांचे अभिनंदन. वेलडन इंडिया’’ असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.

आतापर्यंत २८कोटी डोस

२० जूनपर्यंत देशभरात कोरोना लसीचे २८ कोटी डोस देण्यात आले आहेत. रविवारी दिवसभरात ३० लाख ४० हजार डोस देण्यात आले आहेत.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *