Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशअंडरवर्ल्ड डॉन दाऊद भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत

मुंबई | Mumbai

गँगस्टर दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) भारतात हल्ला करण्याच्या तयारीत आहे. यासाठी त्याने एक विशेष युनिट तयार केल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेने (National Investigation Agency) उघडकीस आणले आहे. या हल्ल्यात राजकीय नेत्यांसह प्रसिद्ध उद्योगपती टार्गेट असल्याचे समजते…

- Advertisement -

दाऊद इब्राहिम त्याच्या विशेष युनिटसह (Special Unit) देशाच्या विविध भागात हिंसाचार भडकवण्याच्या उद्देशाने स्फोटक आणि प्राणघातक शस्त्रे वापरून देशावर हल्ला करण्याची योजना आखत आहे. दाऊदचे दिल्ली आणि मुंबईवर विशेष लक्ष आहे, असे एफआयआरमध्ये झाले आहे.

सिंधुदुर्गातील सात हत्याकांडामागे नारायण राणे; विनायक राऊतांचा गंभीर आरोप

ईडीने अलीकडेच दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध दहशतवादी कारवायांमध्ये आर्थिक मदत केल्याबद्दल मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. ईडी (ED) इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर (Iqbal Kaskar), त्याचे साथीदार आणि टोळीतील सदस्यांची चौकशी करणार आहे. शुक्रवारी इक्बाल कासकरला मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणात 24 फेब्रुवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती.

कासकरच्या चौकशीत महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते. कारण, तो मुख्य सूत्रधार आहे, असे ईडीने न्यायालयाला सांगितले आहे. दरम्यान, ईडीने दाऊद इब्राहिमची दिवंगत बहीण हसिना पारकर (Haseena Parkar), तसेच गँगस्टर छोटा शकीलच्या नातेवाईकांशी संबंध असलेल्या लोकांच्या मुंबईतील 10 ठिकाणी छापे टाकले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या