Thursday, April 25, 2024
Homeनाशिकदावचवाडी सोसायटी निवडणूक बिनविरोध

दावचवाडी सोसायटी निवडणूक बिनविरोध

पालखेड मिरचीचे । वार्ताहर | Palakhed Mirchiche

दावचवाडी सोसायटीची (Davachwadi Society) पंचवार्षिक निवडणूक (election) ज्येष्ठ संचालकांच्या व एकनाथ कुयटे, संपत मोरे, संपत कुयटे, योगेश कुयटे, शिवसेना गटनेता दीपक शिंदे यांचे नेतृत्वाखाली बिनविरोध झाल्याने येथे शिवसेनेचा (shiv sena) वरचष्मा दिसून आला आहे.

- Advertisement -

दावचवाडी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत (election) काल उमेद्वारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) गटाकडून एकही उमेद्वारी अर्ज न आल्याने एकुण 13 जागांसाठी शिवसेनेच्या 13 संचालकांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी, सहकार अधिकारी प्रथम श्रेणी सहकारी संस्था पेठ राजेश इप्पर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल कोटकर यांनी केली. बिनविरोध निवडून आलेले संचालक पुढीलप्रमाणे :

प्रभाकर दौलत कुयटे, भास्कर सखाराम कुयटे, सुरेश रंगनाथ शिंदे, भाऊसाहेब माधव मोरे, विठोबा कारभारी कुयटे, अर्जुन नारायण कुयटे, प्रभाकर दगू शिंदे, संजय वसंत कुयटे. महिला राखीव गटात मंदाकिनी मधूकर कुयटे, कौशाबाई परसराम कुयटे. इतर मागासवर्ग गटात सुदाम छबू कुयटे, अनुसुचित जाती जमाती गटात एकनाथ मल्हारी आहिरे, भटक्या विमुक्त जागेसाठी नामदेव रघुनाथ शिंदे आदींची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला.

यानंतर सोसायटीच्या प्रांगणात आभार सभा घेण्यात आली. सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरत संस्थेत पारदर्शक कामकाज केले जाईल. संस्था व सभासद हिताचे निर्णय घेण्यात येतील असा विश्वास आभार सभेत बोलतांना ज्येष्ठ सभासदांनी व्यक्त केला. बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांचे माजी आमदार अनिल कदम, ज्येष्ठ नेते भास्कर बनकर यांनी अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या