Wednesday, April 24, 2024
Homeनगरदत्तनगर गट व गणाच्या काढलेल्या आरक्षणास दत्तनगर ग्रामस्थांचा तीव्र आक्षेप

दत्तनगर गट व गणाच्या काढलेल्या आरक्षणास दत्तनगर ग्रामस्थांचा तीव्र आक्षेप

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर गट व गणासाठी काढण्यात आलेल्या आरक्षणास दत्तनगर येथील ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. सदरचे टाकलेले आरक्षण हे नियमाला धरुन नसून अन्यायकारक असून तर या गट व गणातील उक्त आरक्षणाचा घेण्यात आलेला निर्णय रद्द करण्यात यावा अशा हरकतीचे निवेदन दत्तनगर ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिले.

- Advertisement -

दत्तनगरची लोकसंख्या ही 10 हजार च्या पुढे आहे. लोकसंख्या ही सेन्सच्या अनुशंगाने म्हणजेच जनगणणेच्या अनुशंगाने 2011 साली दत्तनगरची लोकसंख्या ही आडेआठ हजार होती आणि आज 11 वर्षानंतर10 हजाराच्या पुढे जाते. या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार 80 टक्के लोकसंख्या ही मागासवर्गीय मधील आहे. या प्रमाणानुसारच नियमानुसार मागासवर्गीय लोकांची संख्या त्यांना शासनाचे येणारे विविध फायदे त्यांच्या समस्या व त्याची अंमलबजावणी करण्याकरीता लोकप्रतिनिधी कसा असावा याचे संदर्भात व या बाबीवरुनच आरक्षण निशिचत करणे हितकारक असते.

परंतु तदनंतर सन 2007 ते 2012 ओबीसी महिला, 2012 ते 2017 सर्वसाधारण म्हणजेच खुला, 2017 ते 2022 सर्वसाधारण स्त्री (खुला महिला गट) असे गेल्या तीन पंचवार्षिक पासून अनुसूचित जाती चे2022 ते 2027 करीता या पंचवार्षिक करीता ओबीसी आरक्षण पडले आहे म्हणजेच गेल्या चार पंचवार्षिक पासून दत्तनगर परिसरात लोकसंख्येचा विचार करता अनुसूचित जाती महिला अथवा पुरुष असे आरक्षण पडलेले नाही. त्यामुळे गटाचे नमुद प्रमाणे जाहिर केलेले ओबीसी महिला हे आरक्षण रद्द करुन त्याठिकाणी पुरुष अथवा स्त्री अनुसूचित जाती असे आरक्षण गटाचे पंचवार्षिक निवडणुकीकरीता लागु करण्यात यावे. नव्याने ग्रामपंचायतीची निर्मिती झाली असेल त्यास नविन काऊंटींगचा नियम लागु होतो परंतु सतत पंधरा ते वीस वर्षांपासून अनूसुचित जाती व जमातीच्या उमेदवारांना गणात संधी न देणे हे कायदयाच्या व न्यायहक्कच्या विरुध्द आहे.

पंचायत समितीच्या गट व गणाचे आरक्षण काढण्यात आले असून यावेळी गटाचे आरक्षण इतर मागास वर्ग महला तर गणात सर्वसाधारण असे आरक्षण काढण्यात आले असून सदरचे काढण्यात आलेले आरक्षण रद्द करुन या गावातील मागासवर्गीयांची लोकसंख्या लक्षात घेवून व नियमानुसार आरक्षण पुन्हा काढण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर संदिप मगर, अशोक लोंढे, सुनील संसारे, अजय शिंदे, संजय बोरगे, किरण खंडगळे, अबादास निकाळजे, नितीन दुशिंग, सरपंच सुनील शिरसाठ, अनिल कटरनवरे, संदिप बाहुलकर, बाळासाहेब विघे यांच्या सह्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या