Saturday, April 27, 2024
Homeक्रीडाRun For Green : 'अंजनेरी अल्ट्रा ट्रेल रन - 2023' ची तारीख...

Run For Green : ‘अंजनेरी अल्ट्रा ट्रेल रन – 2023’ ची तारीख जाहीर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिकचे माजी पोलीस आयुक्त व सध्याचे महाराष्ट्र महामार्ग वाहतूक पोलीस अतिरिक्त महासंचालक डॉ.रवींद्र सिंगल आणि ग्रेप काउंटीचे संचालक तेजस चव्हाण यांच्या संकल्पनेतील अंजनेरी अल्ट्रा ट्रेलचा यंदाचा हा तिसरा सिझन असून ‘अंजनेरी अल्ट्रा ट्रेल’ च्या तिसर्‍या सिझनसाठी टी शर्ट अनावरण नुकतेच झाले. यावेळी स्पर्धेच्या तिसर्‍या पर्वाच्या तारखेची देखील घोषणा करण्यात आली.

- Advertisement -

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

ग्रेप काऊंटी येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. रवींद्र सिंगल यांनी ही स्पर्धा आयोजित करण्यामागचा उद्देश व संकल्पना मांडली. तेजस चव्हाण यांनी स्पर्धेचे स्वरूप, थीम याबद्दलची माहिती दिली. त्यानंतर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, आयकर आयुक्त अमित सिंग, सहाय्यक आयकर आयुक्त जसकंवल सिंग, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील, डॉ. सुधीर संकलेचा, डॉ. महेंद्र महाजन, सुयश हॉस्पिटलचे संचालक डॉ. हेमंत ओस्तवाल, नाशिक सायकलीस्ट फाउंडेशनच्या उपाध्यक्षा डॉ. मनीषा रौंदळ या मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचा टी शर्ट अनावरण करण्यात आले.

अंजनेरी अल्ट्रा ट्रेल रन म्हणजे अंजनेरी पर्वत आणि भूप्रदेशाच्या पायवाटेवर धावणे जेथे अतिशय आव्हानात्मक आणि चित्तथरारक असते. ही स्पर्धा जिल्ह्यातील ही पहिली व अनोखी स्पर्धा आहे. जी अवघड अशा अंजनेरी पर्वताच्या पायवाटा, टेकडी, लेणी, जंगल अशा सर्व गोष्टींनी व्यापलेल्या अंजनेरी घाटमाथ्यावर आयोजित करण्यात येते. नाशिकचा प्राचीन वारसा सांगणारी स्थळे, येथील हवामान, कृषी, वनसंपदा ही निसर्गत: देणगी आहेच, म्हणूनच नाशिक शहराचे पर्यटन वाढवणे व साहसी पर्यटन यांसारख्या बाबतीतही नाशिकचा पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा हा या ‘अंजनेरी अल्ट्रा ट्रेल रन’ स्पर्धेच्या आयोजना मागचा मुख्य उद्देश आहे.

देश-विदेशातील स्पर्धक

मागील वर्षी या स्पर्धेत नाशिक, मुंबई, पुणे, औरंगाबाद व कोल्हापूरसह देश – विदेशातील तब्बल 650 हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. तर यंदाच्या तिसर्‍या पर्वासाठी आत्तापर्यंत 100 स्पर्धकांनी या स्पर्धेसाठी आपले नाव नोंदवले असून, आपल्या नाशिकची अनोखी स्पर्धा म्हणून प्रचलित असलेल्या या अंजनेरी अल्ट्रा ट्रेल स्पर्धेत सर्व नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

रन फॉर ग्रीन

अंजनेरी अल्ट्रा ट्रेल रन स्पर्धा रविवार (दि.5 नोव्हेंबर)रोजी आयोजित करण्यात येणार असून, या स्पर्धेच्या तिसर्‍या पर्वाची थीम ‘रन फॉर ग्रीन’ ही ठेवण्यात आलेली आहे. ही स्पर्धा 10 किलोमीटर, 15 किलोमीटर, 30 किलोमीटर, 50 किलोमीटर अशा चार टप्प्यात घेतली जाते. .

स्पर्धेचा मार्ग

ग्रेप काउंटी रिसोर्ट – त्र्यंंबकेश्वर रोड – बेझे फाटा – विवेदा वेलनेस रिसोर्ट – बेझे धरणाच्या बाजूच्या रस्त्याने पुन्हा त्रंबकेश्वर रोड मार्गे ग्रेप काउंटी.

- Advertisment -

ताज्या बातम्या