Friday, April 26, 2024
Homeनगरदारणाच्या पाणीसाठ्यात 20 टक्क्यांनी वाढ

दारणाच्या पाणीसाठ्यात 20 टक्क्यांनी वाढ

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

दारणाच्या पाणलोटात काल मध्यम स्वरुपाचा पाउस होता. या धरणात काल सकाळ पर्यंत एकूण दीड टीएमसी पाणी 1 जून पासुन दाखल झाले. 12.67 टक्के इतका खाली आलेला दारणाचा साठा काल सकाळी 32.44 टक्के इतका झाला होता. 20 टक्के पाणी नव्याने दाखल झाले.

- Advertisement -

गेंल्या दोन दिवसांपासुन सर्वच ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला आहे. असे जरी असले तरी दारणाच्या पाणलोटातील घोटी, इगतपूरी भागात 55 मिमी पावसाची नोंद झाली. दारणाच्या भिंतीजवळ 13 मिमी पावसाची नोंद झाली. घाटमाथ्यावर पावसाने चार पाच चांगली हजेरी लावल्याने पाणी दारणात वाहुन येत आहे. काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासात 421 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले.

हे पाणी अर्धा टीएमसी इतके आहे. 7149 दलघफू क्षमतेच्या दारणात काल सकाळी 2319 दलघफू साठा झाला होता. मुकणे धरणात आता पर्यंत पाउन टीएमसी पाणी दाखल झाले. मुकणेत 45.10 टक्के पाणी साठा तयार झाला आहे. भाम, वाकीमध्ये अद्यापी उपयुक्तसाठा शुन्यावर आहे. भावलीत 29.15 टक्के पाणी साठा तयार झाला आहे. भावलीत नव्याने 352 दलघफू पाणी दाखल झाले. वालदेवीत 19.15 टक्के पाणीसाठा आहे.

गंगापूरच्या पाणलोटात पावसाचे प्रमाण फार समाधानकारक नाही. काल सकाळी 5 मिमी पावसाची नोंद झाली होती. 5630 क्षमतेच्या गंगापूर मध्ये 1727 दलघफू पाणीसाठा आहे. म्हणजेच गंगापूर मध्ये 30.67 टक्के पाणी साठा आहे. गंगापूर समुहातील कश्यपीचा साठा 14.90 टक्के, गौतमी गोदावरीचा 9.96 टक्के, कडवा मध्ये 18.84 टक्के, आळंदीत 0.98 टक्के असा पाणी साठा आहे.

नांदूरमधमेश्वर बंधारा तुंडूंब भरला असल्याने या बंधार्‍याच्या पश्चिमेला असणार्‍या पाणलोटातील तसेच नाशिक शहरातील पाणी वाहुन येत असल्याने या बंधार्‍यातून 500 क्युसेकने सांडवा विसर्ग होत आहे. त्यामुळे गोदापात्रात पाणी वाहत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या