दारणा आज 60, भावली 70 टक्के

jalgaon-digital
3 Min Read

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

सलग दुसर्‍या दिवशी सह्यद्रीचा घाटमाथा पावसाने (Rain) चांगला झोडपून काढला. काल मंगळवारी दिवसभर दारणा (Darna), भावली (Bhavali), गंगापूर धरणांच्या पाणलोटात (Watershed of Gangapur Dam) मुसळधार पावसाचे आगमन होत होते. काल सकाळी 6 च्या आकडेवारी नुसार दारणा (Darna) 55 टक्क्यांवर पोहचले होते. आज बुधवारी ते 60 टक्क्यांपर्यंत पोहचलेले असेल. तर भावली 70 टक्क्यांपर्यंत जाईल.

काल सकाळी भावली 68.52 टक्के भरले होते. गंगापूर धरण (Gangapur Dam) 34 टक्क्यांवरुन 35.15 टक्क्यांवर पोहचले होते. दारणात काल 24 तासांत 428 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले होते. तर गंगापूर (Gangapur Dam) मध्ये 122 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले होते.

काल नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) धरणांच्या क्षेत्रात पावसाचे तांडव सुरुच होते. दारणाच्या पाणलोटातील इगतपुरी (Igatpuri), घोटी (Ghoti) तसेच भावलीच्या (Bhavali) परिसरातील डोंगरमाथ्यावर पाऊस मुसळधारपणे बरसत होता. त्यामुळे घाटमाथ्यावरील धबधबे (Waterfalls) वाहू लागले आहेत. काल सकाळी 6 वाजता मागील 24 तासांत इगतपुरीला 80 मिमी, घोटीला 60 मिमी, दारणाच्या भिंतीजवळ 28 मिमी पाऊस झाला. दारणात (Darna) यामुळे 458 दलघफू नवीन पाणी दाखल झाले.

7149 दलघफू क्षमतेच्या या धरणात 3903 दलघफू पाणीसाठा झाला होता. हे धरण काल सकाळी 54.60 टक्क्यांवर पोहचले होते. दिवसभरातील पावसाने हे धरण 60 टक्क्यांपर्यंत आज सकाळ पर्यंत पोहचलेले असेल. भावली 68.57 टक्क्यांवर पोहचले होते. काल सकाळी 6 पर्यंत 78 मिमी पावसाची नोंद या धरण परिसरात झाली. कालही पाऊस बरसत असल्याने भावलीचा साठा 70 टक्क्यांपर्यंत पेहोचलेला असेल.

गंगापूर च्या पाणलोटातील अंबोलीला (Amboli) पावसाचे तांडव सुरु आहे. काल सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासांत अंबोलीला 118 मिमी पाऊस झाला. त्र्यंबकला (Tryambak) 49 मिमी, गंगापूरला (Gangapur) 45 मिमी असा पाऊस नोंदला गेला. 5630 क्षमतेच्या गंगापूर मध्ये काल सकाळी 6 पर्यंत 1979 दलघफू पाणीसाठा होता. 35.15 टक्के हे धरण भरले आहे. गंगापूरच्या पाणलोटात कालही चांगला पाऊस पडत होता. हळु हहु या धरणाच्या पाणलोटात पाऊस पडत होता.

अन्य धरणांचे स्थिती अशी- मुकणे 24.64 टक्के, वाकी 3.35 टक्के, भाम 19.48 टक्के, वालदेवी 66.28 टक्के, कश्यपी 18.19 टक्के, गौतमी गोदावरी 16.18 टक्के, कडवा 13.45 टक्के, आळंदी 6.25 टक्के, भोजापूर 13.30 टक्के असे भरलेले आहेत. गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात काल सकाळ पर्यंत पाऊस नव्हता. मात्र काल मंगळवारी दिवसभरात काही ठिकाणी पावसाची काही काळ रिपरिप सुरु होती.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *