Friday, April 26, 2024
Homeनगरदरेवाडीत पुर्नवसनातील जमिनीतून बेकायदेशिररित्या हजारो ब्रास माती, मुरुमाचा उपसा

दरेवाडीत पुर्नवसनातील जमिनीतून बेकायदेशिररित्या हजारो ब्रास माती, मुरुमाचा उपसा

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

महाराष्ट्र शासनाकडून पुनवर्सनाअंतर्गत मिळालेल्या जमिन मिळालेल्या आदिवासी लाभार्थींच्या जमिनीतून

- Advertisement -

बेकायदेशिररित्या हजारो ब्रास माती, मुरुम उचणार्‍या व्यक्तींवर कायदेशिर कारवाई करावी, अशी मागणी पांडुरंग नाथा माळी, मच्छिंद्र बारकु पवार, लक्ष्मण बाळा खैरे यांनी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

मौजे दरेवाडी येथील गट नंबर 22 मध्ये वर नमूद केलेल्या अर्जदार व त्यांचे कुटुंबियांना महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागातर्फे मिळालेल्या पुनवर्सनाचे जमिनीमधील माती, मुरुम हे कायदेशिररित्या भास्कर सानप, शिवाजी सानप, बाळु सानप, भरत सानप, शरद सानप, साहेबराव सानप, गणेश सानप, विशाल सानप, किरण सानप, लहानु नागरे, शिवाजी नागरे, अनिल नागरे, सुनिल नागरे, अशोक नागरे, शंकर फड, साहेबराव गिते यांनी संगनमताने दोन जेसीबी व चार ट्रॅक्टरच्या सहाय्याने वरील गट नंबरमधून पाच ते सहा फुट खोलीची माती बळजबरीने धमकी देवून चोरुन नेली आहे.

व ती माती गट नंबर 151 मौजे दरेवाडी येथे टाकली आहे. मच्छिंद्र पवार यांनी त्यांना अटकाव केल्यानंतर वरील इसमांनी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच वरील सर्व मंडळींनी गट नंबर 22 मधील विहीरींमधून बेकायदेशिररित्या पाणी उपसा सुरु केला आहे. याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

मात्र पोलिसांकडून कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. तरी मा. तहसिलदार यांनी सदर प्रकरणी लक्ष घालून माती चोरीचा पंचनामा करावा, तसेच संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करुन दंड वसुल करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर पांडुरंग नाथा माळी, मच्छिंद्र बारकु पवार, लक्ष्मण बाळा खैरे यांच्या सह्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या