Friday, April 26, 2024
HomeजळगावVideo कन्नड घाटात दरड कोसळली ; वाहतुक ठप्प

Video कन्नड घाटात दरड कोसळली ; वाहतुक ठप्प

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

गेल्या चार दिवसापासून सुरु असलेल्या सतत धार पावसामुळे चाळीसगाव-औरंगाबाद महामार्ग क्र.२११ (Chalisgaon-Aurangabad highway) वरील कन्नड घाटातील (Kannada Ghat) महादेव मंदिराजवळ आज संकाळी दरड कोसळली, त्यामुळे तब्बल तीन तास वाहतूक ठप्प होती, सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही.

- Advertisement -

तसेच दोन ट्रक देखील फेल झाले होते. दरड कोसळल्याची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेवून, वाहन चालकांच्या मदतीने महामार्गावर पडलेले दगड व माती बाजूला केली. तर चाळीसगाव येथून मॅकनीक बोलवून नादुरस्त झालेल्या ट्रक देखील दुरुस्त करण्यात आले. त्यानतंर दुपारी १२ वाजेनतंर वाहतूक सुरुळती झाली. मदत कार्यासाठी महमार्गाचे पीएसआय भागवत पाटील, पोहकॉ.श्याम सोनवणे, पोकॉ.सोनार, पवार, नितीन अगोणे, धनराज पाटील, प्रकाश चव्हाण, दिवाकर जोशी आदि उपस्थित होते. सतत धार पावसामुळे कन्नड घाटात नेहमीच दरड कोसळत असतात. त्यामुळे वाहन चालकांनी संभाळून वाहन चालवावे असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या