डांगी कलापथकांचा डंका

सुरगाणा । वाजीद शेख | Surgana

सापुतारा फेस्टिवल (Saputara Festival) मध्ये आदिवासी लोक कला पथकांचा (Tribal folk art troupes) डंका राहिला. तातापाणी भोवाडा कला पथके (Bhowada art teams) ठरले पर्यटकांचे (Tourists) आकर्षण.

परदेशी पाहुण्यांची पावले थिरकली आदिवासी कलेच्या तालावर आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन (Preservation and conservation of tribal culture) करणे हि काळाची गरज आहे असे प्रतिपादन गुजरात राज्याचे पर्यटन व सांस्कृतिक मंत्री पुरणेशभाई मोदी (Gujarat State Tourism and Culture Minister Purneshbhai Modi) यांनी सापुतारा फेस्टिवलचे आयोजन निमित्ताने केले.

सुरगाणा (surgana) शहरापासून अवधे वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरील गुजरात राज्यातील (State of Gujarat) सापुतारा (saaputara) हे थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणी दरवर्षी श्रावण महिन्यात सापुतारा फेस्टिवलचे आयोजन केले जाते. या निमित्ताने गुजरात (gujrat), महाराष्ट्र (maharashtra), मध्य प्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान (Rajasthan) या राज्यातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या फेस्टिवलचे आयोजन केले जाते. डांग, सुरगाणा तालुक्यातील आदिवासी लोककला (Tribal Folk Art), संस्कृती, परंपरा याचे प्रदर्शन या निमित्ताने गुजरात पर्यटन महामंडळाच्या (Gujarat Tourism Corporation) वतीने केले जाते.

आदिवासींची लोककला, पौराणिक संस्कृती, प्रकृती संवर्धन व जतन या गोष्टी पर्यटकांना आकर्षित करतात. या निमित्ताने महिनाभर आयोजन केले जाते. पिंपळसोंड येथील कणसरा माता भोवाडा कलापथक, डोल्हारे येथील भगवान बिरसा मुंडा कलापथक, श्री भुवन चिंचपाडा येथील मादोळ कलापथक या कला पथकांना गुजरात टुरिझम (Gujarat Tourism) तर्फे पर्यटकांचे मनोरंजन, करमणूक करण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. या नृत्य रॅली मध्ये आदिवासी संस्कृतीची भुरळ पडल्याने परदेशी पर्यटक युगांडा (Uganda), केनिया (Kenya), झांबिया (Zambia), मलावी (Malawi), कजाकिस्तान (Kazakhstan), युक्रेन (Ukraine), नायजेरिया (Nigeria), कोंगो (Congo) या परदेशी पाहुण्यांनी भोवाडा नृत्य आदिवासी काळ्या वाजंत्री वर ठेका धरत नृत्य केले.

सापुतारा (saputara) मध्ये मेघ मल्हार पर्वाचे आयोजन उत्साह सुरुवात झाली. एक महिना सुरु असलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनोरंजनाचे कार्यक्रम महिनाभर आयोजित केले जातात.या साठी महाराष्ट्र सिमेवरील कला पथकांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. या शानदार कार्यक्रमा प्रसंगी डांग जिल्हा पंचायत समितीचे अध्यक्ष मंगळभाई गावित, आमदार विजय भाई पटेल, गुजरात राज्य प्रवास निगमचे आलोक पांडे, जिल्हाधिकारी भाविक पंड्या, पोलीस अधीक्षक रविराज सिंह जडेजा, नायब जिल्हा विकास अधिकारी योगेश जोशी, के. जे. भगोरा, प्रांत अधिकारी आर. एम. जालंधरा,

सुर्या जोशी आदी सह पिंपळसोंड भोवाडा कलापथकाचे कलाकार शिवराम चौधरी, काशीराम चौधरी, मोतीराम चौधरी,सिताराम काळी, मोतीराम कुवर,देवराम चौधरी, रमेश बागुल, राहुल गावित, रामदास गावित,कमलेश पवार, शंकर बागुल, केशू गावित,सोन्या पवार, अनू गावित, शिक्षक रतन चौधरी, परशुराम पाडवी, प्रभाकर महाले, भास्कर चौधरी, पांडूरंग चव्हाण, मुकंद पाडवी, नितीन ठाकरे, राजाराम पाडवी, प्रकाश पाडवी, रवींद्र पाडवी, भरत पाडवी, मनोज कुवर, सुरेश गवळी, हेमंत गवळी, सुभाष बागुल, किशोर ठाकरे आदी लोककलाकार सहभागी झाले होते.

महाराष्ट्र (maharashtra) सिमेलगत सापुतारा (saputara) हे थंड हवेचे ठिकाण गुजरात सरकारने विकसित करुन या भागातील हजारो सुशिक्षित, बेरोजगार तरुणांना रोजगार (employment) उपलब्ध करून दिला आहे. या ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गोवा या ठिकाणा हून येताना या निमित्ताने आदिवासींना रोजगार उपलब्ध होतो. याच धर्तीवर सुरगाणा तालुक्यात केम पर्वत, गिरणाचे उगमस्थान, चिराई घाट, बेलबारी, भिवतास धबधबा, तातापाणी पिंपळसोंड साखळचोंड धबधबा, तातापाणी गरम पाणी झरे, भारुंडी धबधबा, देवगाव बांबू क्लस्टर, शिंदे दिगर परिसर ,सापुतारा लगतचा ठाणापाडा परिसर,

अर्जून सागर आदी ठिकाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने प्रकाशझोतात आणून विकसित करुन पर्यटकांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यास तालुक्यातील अनेक गावातील सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळेल. मी गेल्या दहा ते बारा वर्षापासून भोवाडा कलापथक सापुतारा फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी घेऊन जात आहे. या दिवसात कलाकारांना थोड्या फार प्रमाणात रोजगार मिळतो. तालुक्यातील पर्यटनाचा शासनाने गांभिर्याने विचार करावा,असे मत शिवराम चौधरी यांनी व्यक्त केले आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *