Thursday, April 25, 2024
Homeनगरडांगेवाडी शिवारात बिबट्याचे दर्शन

डांगेवाडी शिवारात बिबट्याचे दर्शन

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या डांगेवाडी परिसरात सोमवारी (दि.31) सायंकाळी बिबट्या नागरिकांना आढळून आला. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

डांगेवाडी येथील रहिवासी ज्ञानेश्वर खवले, हाऊसाबाई संताराम कराड यांना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पाथर्डी – शेवगाव राज्य महामार्गावर डांगेवाडी येथील हॉटेल आस्वाद जवळ बिबट्या दिसला. सोशल मीडियावर बिबट्या दिसल्याची व्हिडिओ क्लिपही व्हायरल झाली ती क्लिप 18 ऑक्टोबरचे असल्याची महिती हा व्हिडिओ बनवणारा अमोल रमेश गर्जे राहणार शिरसाटवाडी यांनी सांगितले आहे. गर्जे व त्यांचे अन्य सहकारी हे परगावाहून पाथर्डीकडे जातांना 18 ऑक्टोंबरला रात्री दीड वाजण्याच्या सुमारास साकेगाव आणि डांगेवाडी प्रवासा दरम्यान रस्तावर बिबट्या दिसला होता. त्यावेळी गर्जे यांनी तो व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये चित्रित केला होता.

आता पुन्हा एकदा सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास डांगेवाडी परिसरात बिबट्या दिसला आहे. गर्जे यांनी बिबट्याचे छायाचित्रण आपल्या मोबाईल मध्ये कैद केले. तेरा दिवसांपुर्वी व्हिडिओ केलेला जुना असला तरी बिबट्याचे या ठिकाणी वावर असल्याचे नागरिकांनी सोमवारी (ता.31) स्वतः डोळ्यांनी पाहिला आहे. डांगेवाडी, साकेगाव व अन्य परिसरातील बहुतांश शेती बागायती असून फळबागा व उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर आहे. या ठिकाणी अनेक दिवसापासून बिबट्याचा वावर आहे. वन विभागाने या गांभीर्याने दखल घेऊन परिसरात पिंजरा लावावा. अशी मागणी डांगेवाडी चे उपसरपंच सोमनाथ अकोलकर यांनी केली.

पाथर्डी तालुक्यातील डांगेवाडी शिवारात बिबट्याचा वावर आहे. त्या ठिकाणी वन विभागाचे एक पथक पाठवण्यात आले असून परिसराची पाहणी केली आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकट्याने घराच्या बाहेर पडू नये. आपले जनावरे बंदिस्त गोठ्यामध्ये बांधावेत, घराच्या परिसरात विजेचा प्रकाश रात्रीच्या वेळी ठेवावा.

– अरुण साबळे, वनपरिक्षेत्राधिकारी पाथर्डी

- Advertisment -

ताज्या बातम्या