दंगल घडणार असल्याचा फोन अन् पोलिसांची धावपळ

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील एका मंदिर (Temple) परिसरात काही युवक हिरवे झेंडे लावत असून मोठी दंगल (Dangal) होऊ शकते असा एक फोन डायल 112 या नंबरवर तोफखाना पोलिसांना (Topkhana Police) आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच ही अफवा असल्याचे निष्पन्न झाले. ही घटना 1 ऑक्टोबरच्या पहाटे दोनच्या दरम्यान घडली.

ऑनलाईन पध्दतीने 116 कोटींचे कांदा अनुदान वाटप सुरू

दरम्यान, खोटी माहिती देणार्‍या विरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) अदखलपात्र गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार गोरख मच्छिंद्र धाकतोडे यांनी तक्रार दिली आहे. नगर शहरातील रामवाडी चौक मांगेबाबा मंदिर परिसरात काही युवक हिरवे झेंडे लावत आहेत. या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडून दंगल होऊ शकते असा एक कॉल पोलिसांच्या डायल 112 नंबर वर आला. ताबडतोब हा संदेश तोफखाना पोलिसांना देण्यात आला.

कोठला भागात दोन गटात हाणामारी

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी धाव घेतली. परंतु याठिकाणी शांतता होती. कोणताही गडबड गोंधळ नव्हता. तरीही खात्री करण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. परंतु असा कोणताही अनुचित प्रकार मागील अनेक दिवसांपासून घडलाच नसल्याचे त्यांनी सांगितले.

युवकाच्या गळ्यातील चैन ओरबडली; सावेडीतील घटना

त्यामुळे ही केवळ अफवाच असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ही माहिती देणार्‍यास कॉल लावण्याचा प्रयत्न केला परंतु कॉल उचललाच गेला नाही. अखेर पोलिसांनी या घटनेची स्टेशन डायरीत नोंद करत खोटी माहिती देणार्‍या विरूध्द गुन्हा दाखल (Filed a Case) केला.

दिवसा घरफोड्या करणारी अल्पवयीन मुलांची टोळी पकडली

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *