Friday, April 26, 2024
Homeनगरदंडकारण्य अभियानामुळे पर्यावरण संवर्धन संस्कृती वाढीस - आ. थोरात

दंडकारण्य अभियानामुळे पर्यावरण संवर्धन संस्कृती वाढीस – आ. थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

ग्लोबल वार्मिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन हे अत्यंत महत्त्वाचे असून याकरिता दंडकारण्य अभियानाच्या माध्यमातून मागील सोळा वर्षात मोठे काम झाले आहे. संगमनेर तालुका हा वृक्ष हिरवाईने नटण्यासाठी तालुक्यातील सर्व नागरिकांनी घेतलेला सहभाग आणि या अभियानामुळे वाढलेली पर्यावरण संवर्धन संस्कृती ही राज्यासाठी दिशादर्शक ठरली असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व माजी प्रांताध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहेत.

- Advertisement -

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्यावतीने पिंपळगाव कोंझिरा परिसरातील काळा खडक डोंगर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी बँकेचे चेअरमन अमित पंडित, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, बादशहा वाळुंज, बापूसाहेब करपे, उपसरपंच सौ. गाडे, विकास आहेर, डी. एम. लांडगे, विराज मोरे, भूषण घुले, राजू खानेकर, संतोष कर्पे, बँकेचे मॅनेजर रमेश थोरात, बादशहा आहेर, पोलीस पाटील बाळासाहेब झोडगे, राधाकिसन कर्पे, संगम आहेर, विक्रम मोरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी स्वर्गीय अशोकराव मोरे यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना आ. थोरात म्हणाले, थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी वयाच्या 84 व्या वर्षी दंडकारण्य अभियान सुरू केले. मागील सोळा वर्षाच्या तालुक्यातील उघडे बोडके डोंगर हिरवे होण्यास मदत झाली आहे. पर्यावरण संवर्धनाच्या या अभियानात तालुक्यातील बालगोपाळ, वृद्ध, महिला, तरुण, नागरिक या सर्वांनी सहभाग घेतला. आणि खर्‍या अर्थाने ही वृक्ष संवर्धनाची मोठी लोक चळवळ ठरली. या अभियानाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली असून सध्या युरोपमध्ये विविध जंगलांना आगी लागून पर्यावरणाचा मोठा र्‍हास होत आहे. हे पृथ्वीचे तापमान वाढीच्यादृष्टीने अत्यंत भयावह आहे. यासाठी सर्वांनी वृक्षारोपण व संवर्धन केले पाहिजे.

तर अमित पंडित म्हणाले, आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात वृक्षारोपण व संवर्धनाचे मोठे काम होत आहे. अमृतवाहिनी बँकेने सातत्याने या अभियानात सहभाग घेतला असून काळा खडक परिसरातील वृक्ष संवर्धनासाठी काम केले जाईल, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष कर्पे यांनी केले तर बँकेचे मॅनेजर रमेश थोरात यांनी आभार मानले. यावेळी गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या