Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रलाल महाल लावणी प्रकरण : वैष्णवी पाटीलचा जाहीर माफीनामा, पाहा नेमकं काय...

लाल महाल लावणी प्रकरण : वैष्णवी पाटीलचा जाहीर माफीनामा, पाहा नेमकं काय म्हटलंय?

पुणे । Pune

पुण्यातील (pune) ऐतिहासिक लाल महालात (lal mahal) ज्या ठिकाणी बसून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले स्वराज्य चालवले, त्या महालात लावणीचा व्हिडीओ शूट केल्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यावर अनेक राजकीय, सामाजिक आणि कलाविश्वातील लोकांकडून उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत.

- Advertisement -

यानंतर आता स्वतः वैष्णवी पाटीलने (vaishnavi patil) या प्रकरणी जाहीर माफी मागितली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी करत तिने जाहीर माफी मागितली आहे. या व्हिडीओत तिने माझ्याकडून लालमहालात लावणीचा व्हिडीओ शूट करून चूक झाली आहे. त्यासाठी मी सर्वांची माफी मागते, असं मत व्यक्त केलं आहे.

दरम्यान या प्रकरणी (Lal Mahal Lavani case) मराठी कलाकार वैष्णवी पाटील यांच्यासह दोन अनोळखी व्यक्तींविरोधात फरासखाना पोलीस (Faraskhana Police Station Pune) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाल महालाचा रखवालदार राकेश विनोद सोनवणे (वय ३७) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. लाल महाल या पवित्र वास्तूचे पावित्र्य भंग केले म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या