Thursday, April 25, 2024
Homeनाशिकपथदीपाचे नुकसान; व्यावसायिकावर गुन्हा

पथदीपाचे नुकसान; व्यावसायिकावर गुन्हा

नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

अभियंता नगर कामटवाडे येथे एका व्यावसायिकाने मनपाचा पथदीप वाहन पार्किंगसाठी अडचण होत असल्याने परस्पर वाहनाने ठोस मारून उखडून टाकल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभियंता नगर कामटवाडे येथे मनपा विद्युत विभागाचा पथदीप येथील अंडे व्यावसायिक राजेंद्र लावरे यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने उखडून टाकल्याचा व्हिडिओ नागरिकांनी मनपा विद्युत विभागाचे अधिकारी मोहन गीते यांना पाठविला.

यावरून गीते यांनी अंबड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे की, त्यांना एका नागरिकाचा फोन आला की, दिनांक 28 नोव्हेंबर रोजी दुपारी एक ते दीड वाजेच्या दरम्यान ज्ञानदा अपार्टमेंट अभियांता नगर सोसायटी समोर ट्रक क्रमांक एम एच 15 ई एफ 8010 या वाहनावरील चालक गिरीश काळू पाटील राहणार गणेश चौक नवीन नाशिक याने महानगरपालिकेचा इलेक्ट्रिक पोल वाकून नुकसान केले.

यावरून गीते यांनी यांच्या सहकार्‍यांसह सदर परिसराला भेट देऊन सदर घटनेची माहिती घेतली. एका नागरिकांनी त्यांना सदर पथदीप पाडत असल्याचा व्हिडिओ दाखवत त्यात अंडे व्यवसायिक राजेंद्र तावरे यांच्या गाळ्या समोर असलेला पथदीप त्यांच्याकडे येणाऱ्या वाहनांना अडथळा ठरत असल्यामुळे त्यांनी व त्यांच्याकडील काम करणारे दोन इसम तसेच ट्रक ड्रायव्हर अशांनी सदर पथदीप पूर्णपणे उखडून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. या प्रकरणी लावरे यांच्यासह त्यांच्या कर्मचाऱ्यांवर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पुढील तपास वपोनी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार चव्हाण करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या