Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedगुलाब वादळाने 125 दुकानांमध्ये पाणी

गुलाब वादळाने 125 दुकानांमध्ये पाणी

औरंगाबाद – Aurangabad

शहरात गुलाब वादळाने मंगळवारी चांगलाच धुमाकूळ घातला. या वादळात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शहरातील नाले तुडूंब भरून वाहले. तर सखल भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचून ते नागरिकांच्या घरांत शिरले. या नुकसानीचा पाहणी अहवाल महापालिका प्रशासनाने (Municipal administration) तयार केला आहे. त्यानुसार विविध भागातील 122 घरे व दुकानांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे नुकसान झाले. 29 झाडे पडून या घटनांत 8 वाहनांचे नुकसान झाले आहे. प्रभाग-1 मध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याचेही अहवालात नमूद केले आहे.

- Advertisement -

मंगळवारी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शहरात विविध ठिकाणी झाडे पडली. घराच्या भिंती खचून कोसळल्या. शासकीय मालमत्तेचे नुकसान, रस्ता, पोल यांना झालेली क्षती, तसेच विविध प्रभाग कार्यालयांच्या अधिकार क्षेत्रात व नाल्यांलगत असलेल्या वसाहतींमध्ये पाणी शिरणे, पाणी साचणे, खासगी, शासकीय वाहनांचे नुकसान अशा विविध घटना या पावसात शहरभरात घडल्या.

याची प्रभागनिहाय पालिकेच्या अधिकार्‍यांनी पाहणी केल्यानंतर पालिकेने प्राथमिक माहिती प्रशासनाने तयार केली आहे. सोमवार व मंगळवारी दिवसभर शहरात पावसाचे सातत्य होते. या कालावधीत शहरातील 9 प्रभागांमध्ये नेमके किती व कोणत्या प्रकारचे नुकसान झाले, या विषयीचा अहवाल पालिकेने तयार केला आहे. या दोन दिवस झालेल्या पाऊस ववादळाचा सर्वाधिक फटका प्रभाग-1 मधील नागरिकांना अधिक बसला आहे. येथील 53 घरे तसेच दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे अधिक नुकसार झाले आहे. याच प्रभागातील विविध वसाहतींत 17 झाडेही पडल्याचे पालिकेच्या अहवालात नमूद केले आहे.

पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांची तारांबळ उडाली. खाम नदीला पूर आल्यामुळे नदीपात्राशेजारील वसाहती तसेच सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याचेही अहवालात नमूद केले आहे.

प्रभाग-1 मधून 53, प्रभाग-2 मधून 6, 3 मधून 5, 4 मधून 4, प्रभाग 5 व 6 मधून 11, 7 मधून 8, तर प्रभाग-8 मधून 17 आणि प्रभाग 9 मधून 7 अशा एकूण 122 ठिकाणांमध्ये घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाल्याच्या तक्रारी आल्याचे या अहवालात म्हटले आहे. या अहवालात मंगळवारच्या पावसात शहरातील पाच ठिकाणच्या भिंती पडल्याचेही नमूद आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या