Wednesday, April 24, 2024
Homeधुळेधुळ्यात गोडावूनला आग

धुळ्यात गोडावूनला आग

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शहरानजीक असलेल्या अवधान औद्योगिक वसाहतील अग्रवाल वेअर हाऊसिंग कारपोरेशनच्या गोडावूनला रविवारी सायंकाळी भिषण आग लागली.

- Advertisement -

आग विझविण्यासाठी मनपासह शिरपूर, शिंदखेडा, दोंडाईचा व टोल नाक्यावरील बंब दाखल झाले होते. आठ ते दहा तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आहे.

आगीत गोडावूनमधील कापसाच्या गठाणी, सरकी ढेप खाक होवून 5 कोटी 20 लाख 7 हजार 200 रूपयांचे नुकसान झाले आहेत. याबाबत मोहाडी पोलिसात नोंद झाली आहे.

अवधान औद्यागिक वसाहतील प्लॉट नं. 9 मध्ये नॅशनल कोलॅटरल मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीचे अग्रवाल वेअर हाऊसिंग कारपोरेशन गोडावुन आहे. त्यात कापासाच्या गठाणी, सरकी ढेप असा माल ठेवण्यात आलेला होतो.

दि. 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गोडावूनला फटाके किंवा शार्टसर्कीटमुळे आग लागली. आगीची घटना लक्षात येताच मनापाच्या अग्नीशमन दलाला माहिती देण्यात आली.

त्यानंतर मनपाचे बंब व टोल नाक्यावरील बंबही दाखल झाले. तोपर्यात आगीने रौद्र रूप घेतले होते. त्यामुळे शिरपूर, शिंदखेडा व दोंडाईचा येथील बंब दाखल झाले. एकुण आठ बंबांनी असंख्य फेर्‍या करून पाण्याचा मारा सुरू ठेवला.

अखेर आठ ते दहा तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळण्यास यश आले. आगीत कापासाच्या गठाणी, सरकी ढेप खाक होवून 5 कोटी 20 लाख 7 हजार 200 रूपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत मॅनेजर सिध्दार्थ रमेश वाघ (वय 39 रा. अवधान) यांच्या माहितीवरून मोहाडी पोलिसात अग्नी उपद्रवाची नोंद झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या