Friday, April 26, 2024
Homeनगरधरणांच्या पाणलोटात पावसाची विश्रांती

धरणांच्या पाणलोटात पावसाची विश्रांती

अस्तगाव|वार्ताहर|Astgav

नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाने विश्रांती घेतली आहे. लाभक्षेत्रात पावसाची स्थिती चांगली असताने पाणलोटात मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकर्‍यांच्या नजरा नाशिकच्या पावसाकडे लागल्या आहेत.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस असणार्‍या इगतपूरी, घोटी परिसरात पावसाने ऐन पावसाळ्यात दिवस दिवस कोरडे जात आहेत. काल सकाळी संपलेल्या 24 तासात इगतपूरी, घोटी, दारणाचा परिसर भागात पाऊस शुन्य होता. भावलीला अवघा 9 मिमी पाऊस नोंदला गेला.

गेल्या वर्षी या दिवसात दारणातुन विसर्ग सुरु होवून धरणात 87 टक्के पाणीसाठा होता. मात्र कालचा साठा 69.23 टक्के इतकाच आहे. दारणाचे सर्व गेट बंद आहेत. 7149 दलघफू क्षमतेच्या दारणात 4949 दलघफू पाणीसाठा आहे. तर 5630 दलघफू क्षमतेच्या गंगापूर धरणात 2940 दलघफू पाणीसाठा आहे.

हे धरण 52.22 टक्क्यांवर आठवडाभरापासुन स्थिर आहे. मागील वर्षी कालच्या तारखेला हे धरण 84 टक्के भरलेले होते. जवळपास 32 टक्क्यांचा फरक आहे. भावली कालच्या आकडेवारी नुसार 89.72 टक्के आहे. मागील वर्षी ते लवकरच 100 टक्के होवून त्यातून विसर्गही सुरु झाला होता.

काल सकाळी संपलेल्या 24 तासात गंगापूरला 10, मधमेश्वरला 3, वाकीला 1, पालखेडला 24, असा पाऊस या चार ठिकाणी नोेंदला गेला. अन्यत्र पावसाची नोंद नाही. अन्य धरणांची स्थिती या प्रकारचीच आहे. मात्र गोदावरी कालव्यांच्या पाणलोटात मात्र पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे.

दारणाला 1 जूनपासुन काल अखेरपर्यंत 390 मिमी एकूण पाऊस आहे. तर गोदावरीच्या कालव्यावरील कोपरगावला 495, पढेगावला 403, राहात्याला 591, रांजणगावला 481, चितळीला 458 मिमी पाऊस 1 जूनपासुन एकूण पडलेला आहे.

मात्र दारणाच्या पाणलोटातील इगतपूरीला 1527 मिमी, घोटीला 702 मिमी पाऊस एकूण नोंदला गेला आहे. खरे तर धरणांच्या पाणलोटात पावसाचे प्रमाण नेहमीप्रमाणे अधिक असायला हवे, पंरतु यावर्षी मान्सुनपुर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. आणि आता पावसाचे प्रमाण कमी झाले.

जायकवाडी प्रकल्पात 46.72 टक्के पाणीसाठा उपयुक्त पाणी साठा आहे. हा साठा 65 टक्के होण्यासाठी नाशिक, नगरच्या धरणांमधुन पाणी सोडण्याची वेळ येवु नये म्हणुन गोदावरीतुन आणि मुळा-प्रवरातुन ओव्हरफ्लोचे पाणी जायला हवे. धरणे भरतीलही पण ओव्हरफ्लोचे पाणी नदीमार्गे जायला हवे, यासाठी धरणांच्या पाणलोटात जोरदार पावसाची गरज आहे.

काल सकाळपर्यंत धरणांचे साठे असे- पालखेड 32.21 टक्के, करंजवण 18.61 टक्के, कडवा 22.39 टक्के, मुकणे 28.37 टक्के, भोजापूर 29.64 टक्के, आंळंदी 0.80 टक्के, कश्यपी 24.89 टक्के, वालदेवी 34.20 टक्के, गोदावरी गौतमी 21.25 टक्के, भावली 89.72 टक्के, वाकी 7.39 टक्के, भाम 39.96 टक्के असे धरणांमध्ये साठे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या