Friday, April 26, 2024
Homeनगर10 धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा !

10 धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पिण्याचे पाणी, शेती, उद्योग-व्यवसाय अवलंबून असलेल्या नगर जिल्ह्यासह नाशिक, पुणे जिल्ह्यातील दहा धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. लाभधारकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कारण धरणांतील पाण्यावरच या जिल्ह्यातील शेतकरी आपल्या पिकांचे नियोजन करीत असतात.

- Advertisement -

11039 दलघफू क्षमतेचे धरण पूर्ण भरले आहे. 8320 दलघफू क्षमतेच्या निळवंडेत 99.51 टक्के पाणी आहे. या धरणातूनही सध्या विसर्ग सुरू आहे. 26000 दलघफू क्षमतेच्या मुळातील पाणीसाठा 90 टक्के आहे.तसेच 1060 दलघफू क्षमतेचे आढळाही पूर्ण भरलेले आहे.

नाशिक जिल्ह्यातील धरणांतील पाण्याचा उत्तर नगर जिल्ह्यातील काही तालुक्यांना लाभ होतो. त्यातील 5630 दलघफू क्षमतेचे गंगापूर, 7149 दलघफू क्षमतेचे दारणा, 361 दलघफू क्षमतेचे भोजापूर या धरणांमध्येही 100 टक्के पाणीसाठा असून काही धरणांतून विसर्ग सुरू आहे.

पुणे जिल्ह्यातील कुकडी समूह धरणांमध्येही समाधानकारक साठा आहे. या धरणातील पाण्याचा दक्षिण नगर जिल्ह्यातील तालुक्यांना लाभ होतो. त्यात 12500 दलघफू क्षमतेचे डिंभे, 1172 दलघफू क्षमतेचे वडज, 5979 दलघफू क्षमतेचे घोड ही धरणे 100 टक्के भरलेली आहेत.

जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाचा मोठा खंड पडल्याने धरणं रिकामी होती. तसेच शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. पण गत 15 दिवसांपासून पडणार्‍या पावसाने दिलासा दिला. अनेक धरणांचे पोट भरले तर काही 80-90 टक्क्यांवर आहेत. काही धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. पाऊस झाल्याने पाणलोटासह लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या