Saturday, April 27, 2024
Homeनगरमंजूर बंधारा डिझाईनसाठी माती परीक्षण सुरु

मंजूर बंधारा डिझाईनसाठी माती परीक्षण सुरु

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील मंजूर येथील मंजूर, चास, हंडेवाडी, धामोरी, मोर्वीस, मायगाव देवी, कारवाडी, वेळापूर, बक्तरपूर आदी गावांच्या शेतीसाठी वरदान ठरणारा गोदावरी

- Advertisement -

नदीवरील कोल्हापूर टाईप बंधारा महापुरामध्ये दोनदा वाहून गेला होता. या पुलाचे दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेवून मंजूर बंधार्‍याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा अशी मागणी केली होती.

त्या मागणीला जलसंपदा विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून मंजूर बंधार्‍याचे डिझाईन करण्यासाठी माती परीक्षणाचे काम सुरु करण्याचे आदेश दिले असून प्रत्यक्षात माती परीक्षणाचे काम सुरु झाले असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

2019 च्या महापुरामध्ये मंजूर बंधारा दुसर्‍यांदा वाहून जाऊन शेतकर्‍यांच्या उभ्या पिकासह शेतजमिनी, विहिरीसह वाहून गेल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे या बंधार्‍यावर अवलंबून असलेल्या मंजूर, चास, हंडेवाडी, धामोरी, मोर्वीस, मायगाव देवी, कारवाडी, वेळापूर, बक्तरपूर आदी गावातील शेतीचे अस्तित्व धोक्यात आले होते.

याबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेत मंजूर बंधार्‍याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा व या पुलाचे कायमस्वरूपी टिकावू काम करावे याबाबत पाठपुरावा सुरु असून जलसंपदा विभागाचे अधिकार्‍यांनी मागील सहा महिन्यात दोन ते तीन वेळेस प्रत्यक्षपणे या मंजूर बंधार्‍याची पाहणी केली आहे.

चालू वर्षीच्या पावसाळ्यात या बंधार्‍यात पाणी अडविले जावे त्यादृष्टीने प्राथमिक स्वरूपातील काम मे महिन्याच्या सुमारास हाती घेण्यात आले होते. मात्र जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीला नादुर मध्यमेश्वर बंधार्‍यातून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे हे काम पूर्ण होवू शकले नाही.

मात्र या पुढील काळात मंजूर बंधार्‍याचे शाश्वत व टिकावू काम करण्यासाठी या बंधार्‍याचे डिझाईन करण्याचे काम जलसंपदा विभाग करणार आहे. त्यासाठी सी.डी.ओ.नाशिक संस्थेला आराखडा तयार करण्याचे उच्चस्तरीय आदेश प्राप्त झाले असून त्यासाठी या संस्थेने मंजूर बंधार्‍याच्या परिसरातील भूगर्भातील प्राथमिक माती परिक्षणाबरोबरच भूगर्भात खडक किती खोलीवर आहे. त्यानुसार डिझाईन तयार करण्यात येणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या