Thursday, April 25, 2024
Homeनाशिकदहीवाडी-कानळद रस्ता खुला करा

दहीवाडी-कानळद रस्ता खुला करा

वावी । Vavi (वार्ताहर)

सिन्नर तालुक्यातील दहीवाडी ते कानळद या रस्त्यावर काही शेतकर्‍यानी अतिक्रमण केले असून रस्ता खुला करण्यास संदर्भात ग्रामपंचायतीने तहसीलदारांना साकडे घातले आहे.

- Advertisement -

विकास कामात अडथळा आणणार्‍या ग्रामस्थांवर कारवाही करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.

दहीवाडी ते कानळद रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून परिसरातील ग्रामस्थांना ये जा करण्यासाठी परिसरात अतिशय महत्वाचा रस्ता आहे. येथील शेतकर्‍यांना लासलगाव येथील बाजारसमितीत मालवाहतूक करण्याकरिता जवळचा असलेल्या या रस्त्याची अत्यंत गरज भासते. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी आ. माणिकराव कोकाटे यांच्याकडे निधीची मागणी केली होती.

त्यानुसार या रस्त्याकरीता जि. प. च्या मूलभूत सुविधा योजने अंतर्गत रस्त्याची मंजुरी मिळाली जवळपास 1200 मीटरचा रस्ता मंजूर झाला आहे. दहीवाडी गावाला दळणवळणाच्या दृष्टीने सोयीस्कर व्हावे म्हणून मागील वर्षी या रस्त्याची मंजुरी आली आहे.

मात्र काही स्थानिक शेतकर्‍यांच्या आडमुठेपणामुळे या रस्त्याच्या कामास विलंब होत आहे. ग्रामपंचायतीने वारंवार प्रयत्न करून देखील काही स्थानिक शेतकरी या रस्त्याच्या कामाला अडथळा निर्माण करत आहे. याबाबत ग्रामपंचायत मध्ये ठराव देखील करण्यात आला असून जवळपास 90 टक्के शेतकर्‍यांनी रस्ता व्हावा यासाठी संमती दिली आहे.

त्यामुळे अडथळा आणणार्‍या शेतकर्‍यांवर कारवाई करून रस्ता दुरुस्तीसाठी खुला करावा अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे. निवेदनावर सरपंच सोपान आरोटे, उपसरपंच शरद माळी, सदस्य वर्षा गाढे, ज्योती आरोटे आदींसह शेतकर्‍यांच्या सह्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या