Thursday, April 25, 2024
Homeनगरदहेगाव बोलकामध्ये नाशिकच्या इसमाचा मृतदेह आढळला

दहेगाव बोलकामध्ये नाशिकच्या इसमाचा मृतदेह आढळला

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील दहेगाव बोलका शिवारातील नागपूर-मुंबई महामार्गाच्या कडेला नाशिक जिल्ह्यातील सिडको उत्तमनगर येथील इसम अभिजित राजेंद्र सांबरे याचा मृतदेह आढळून आल्याने हा घातपात आहे की अन्य काही यावरून एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

सदर इसम हा पुलाजवळ मृत अवस्थेत पडलेला होता. याबाबत तालुका पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. या व्यक्तीच्या अंगावरील कपड्यात आधारकार्ड व ड्रायव्हिंग लायसन मिळून आले. त्यावरून त्याची ओळख पटली असून त्याचे नाव अभिजित राजेंद्र सांबरे, रा. सिडको उत्तमनगर, नाशिक असे आहे.

सदर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तीचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत असला तरी त्याच्या मृत्यूचे कारण पोलिसांच्या तपासा अंती समोर येणार आहे. याबाबत कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पो. नि. वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गवसने करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या