Thursday, April 25, 2024
Homeनाशिकदादासाहेब फाळके स्मारक पर्यटकांसाठी खुले

दादासाहेब फाळके स्मारक पर्यटकांसाठी खुले

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार ( NMC Commissioner Ramesh Pawar ) यांनी विशेष लक्ष दिल्यामुळे मागील सुमारे दोन वर्षांपासून बंद असलेला तसेच नाशिकचे वैभव ठरलेल्या फाळके स्मारक ( Dadasaheb Phalke Smarak ) पुन्हा सुरू झाले आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. आयुक्तांसह महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी याठिकाणी पाहणी करून विविध प्रकारच्या सुविधांचा आढावा घेतला.

- Advertisement -

स्मारकातील उद्याने विकसित करणे, साफसफाई, रंगरंगोटी, कारंजे सुरू करणे, धबधबा सुरु करणे, सुरक्षा व्यवस्था पुरविणे इत्यादी कामे पूर्ण झाली आहेत. तर ऑडिटोरियम, एक्झिबिशन हॉल, रेस्टॉरंट तसेच वॉटर पार्क चालू करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे.

निविदा प्रक्रिया राबवून फिल्म सिटीच्या धर्तीवर फाळके स्मारकाचा विकास करण्यात येणार आहे.1 जुलै 2022 पर्यंत सर्वांना विनामूल्य प्रवेश राहणार आहे. त्यानंतर मात्र पूर्वीप्रमाणेच दर आकारण्यात येणार आहेत.

या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त रमेश पवार, महापालिकेचे प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील, विभागाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. आवेश पलोड आदी अधिकार्‍यांनी पाहणी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या