Thursday, April 25, 2024
Homeजळगावसेनेच्या महिला पदाधिकार्‍यांची भाईगिरी

सेनेच्या महिला पदाधिकार्‍यांची भाईगिरी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

महाराष्ट्र बंद आंदोलन(Maharashtra Bandh Andolan) झाल्यानंतर शिवसेनेच्या महिला पदाधिकार्‍यांनी (Shiv Sena women office bearers) नवीपेठेतील एका दुकानदाराकडे (Shopkeeper) वेफर्स, चिवडा व लस्सीची मागणी केली. परंतु त्याचे पैसे न देता (Without paying) त्या तेथून निघत असतांना दुकानदाराने त्यांची चारचाकी अडवित पैसे मागितले. (Asked for money) त्याचा राग आल्याने त्या महिलांच्या वाहनाने त्या विक्रेत्याला काही अंतर फरफटत नेले. त्यामुळे तो विक्रेता जखमी (Seller injured) झाल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. दरम्यान पदाधिकार्‍यांनी मध्यस्थी करुन वाद मिटविला.

- Advertisement -

याबाबत विक्रेत्याकडून मिळालेली माहिती अशी की, नवीपेठेतील किर्तीकुमार चोरडीया यांचे दूध विक्रीचे दुकान असून त्याठिकाणी ते चिवडा, वेफर्ससह कोल्ड्रींक्सची देखील विक्री करतात. आज महाविकास आघाडीने महाराष्ट्रबंदची हाक दिली असल्याने राजकीय पदाधिकारी दुकाने बंद करीत होते. याचवेळी काही आंदोलक त्यांच्या दुकानाजवळ आले. त्यांनी चोरडीया यांना दुकान बंद करण्यास सांगितले असता, चोरडीया यांनी मी अत्यावश्यक सेवेतील आहे असे म्हणत दुकान बंद करण्यास नकार दिला. त्यानंतर आंदोलक त्याठिकाणाहून निघून गेले. मात्र थोड्यावेळानंतर शिवसेनेच्या महिला पदाधिकारी एका आलिशान चारचाकीतून चोरडीया यांच्या दुकानावर आल्या. त्यांनी चोरडीया यांच्याकडे लस्सीची व कोल्ड्रींग्सची मागणी केली. त्यानुसार चोरडीया यांनी त्यांना वस्तू दिल्या.

पैसे पाठविते असे सांगत बसल्या गाडीत

लस्सी, कोल्ड्रींक्सह चिवडा व वेफर्सची खरेदी झाल्यानंतर त्या महिला पदाधिकारी आलेल्या आपल्या चारचाकी वाहनाकडे निघून जात असतांना चोरडीया यांनी त्यांना पैसे मागितले. यावेळी त्या पदाधिकार्‍यांपैकी एक महिला गाडीतील कार्यकर्त्याकडे पैसे पाठवतेे असे म्हणत ती गाडीत बसली. त्यानंतर गाडी तेथून निघत असल्याचे बघताच किर्तीकुमार चोरडीया हे गाडीकडे धावत गेले. यावेळी त्यांनी गाडीच्या काचेजवळ पकडून गाडी थांबविण्याचा प्रयत्न करीत असतांना वाहनचालकाने गाडी जोरात चालवित त्यांना काही अंतरापर्यंत फरफटत नेल्याने त्यांच्या पायाला दुखापत होवून चार टाके देखील पडले.

असा पडला वादावर पडदा

सेनेच्या महिला पदाधिकार्‍यांना पैशांची मागणी केल्यामुळे त्यांनी सुरुवातीला चोरडीया यांची कॉलर पकडीत त्यांना शिवीगाळ केली. यामुळे त्यांचा शर्ट देखील फाटला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, ही माहिती जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे व महानगरप्रमुख शरद तायडे यांना माहित पडताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर त्यांनी विक्रेत्याची समजूत काढीत महिला पदाधिकार्‍यांना पैसे देण्याच्या सूचना करीत वादावर पडदा टाकला.

ती चारचाकी सेनेच्या पदाधिकार्‍याची

सेनेच्या महिला पदाधिकारी विक्रेत्याकडे ज्या अलिशान चारचाकीतून आल्या होत्या.ती चारचाकी सेनेचे एका बड्या पदाधिकार्‍याची होती. दरम्यान चारचाकी वाहनातून आलेल्या पदाधिकार्‍यांनी किरकोळ स्वरुपाच्या रकमेसाठी केलेल्या या प्रकाराची चर्चा दिवसभर सुरु होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या