Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकभुसेंची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी

भुसेंची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी

मालेगाव | Malegaon

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या विस्तारात (cabinet expansion) मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचे (Malegaon Outer Assembly Constituency) आमदार दादा भुसे (MLA Dada Bhuse) यांनी पुन्हा कॅबिनेट मंत्रीपदाची (Cabinet Minister) शपथ घेतली. भुसे यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळताच शहर, तालुक्यात समर्थक कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. शहरातील मोसमपूल चौकात (Mosampool Chowk) कार्यकर्त्यांनी मिरवणुकी काढत फटाक्यांची आतषबाजी करून नागरिकांना पेढे वाटून आपला आनंद द्विगुणीत केला. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाचा जयघोष करत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला…

- Advertisement -

शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या उठावात माजी मंत्री दादा भुसे यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) यांना शिंदे व भुसे आपले गुरू मानतात. शिंदे यांच्याबरोबर भुसे यांचे अत्यंत घनिष्ट संबंध असल्यामुळेच नाशिकला होणारी उत्तर महाराष्ट्राची महसूल विभागाची आढावा बैठक मालेगावी घेत मुखमंत्री शिंदे यांनी भुसेंच्या योगदानाचे महत्व अधोरेखित केले होते.

तसेच शिंदे यांचा मालेगावी विराट जनसमुदायाच्या उपस्थितीत भव्य नागरी सत्कार करत भुसे यांनी या उठावानंतर देखील आपले सामर्थ्य जैसे थे असल्याची चुणूक दाखवून दिली होती. भुसे आपले बंधू असून त्यांच्या पाठिशी आपण भक्कमपणे उभे आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी सत्कार सोहळ्यात मार्गदर्शन करतांना दिल्याने पहिल्या टप्प्यातील मंत्र्यांच्या यादीत भुसे यांचा समावेश राहणार असल्याचा संकेत मिळाला होता.

अपेक्षेनुसार आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रीपदाची संधी भुसे यांना पुन्हा मिळाल्याने शहर, तालुक्यातील समर्थक कार्यकर्ते उत्साहीत झाले आहेत. युती शासनात सहकार व ग्रामविकास राज्यमंत्रीपदी वर्णी लागलेल्या भुसेंनी विधानसभा निवडणुकीत विजयाचा चौकार मारला होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये (Maha Vikas Aghadi Government) त्यांना कृषिमंत्री म्हणून कॅबिनेट मंत्रीपदावर बढती मिळाली होती.

कृषिसारखा महत्वाचा विभाग मिळाल्याने शेतकरी (farmer) हिताच्या विविध योजना राबवत या विभागास न्याय देण्याचा प्रयत्न भुसे यांनी केला होता. मालेगाव तालुक्यास देखील पाच विद्यालयांचा समावेश असलेल्या कृषि विज्ञान संकुलास मंजुरी आणत या संकुलांचे भुमीपूजन देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते त्यांनी करवून घेतले. शेतकरी हितासाठी हा महत्वाचा निर्णय भुसे यांनी घेतला होता. कॅबिनेट मंत्रीपदी त्यांची पुन्हा वर्णी लागल्याने जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

दरम्यान, आज सकाळी भुसे यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच समर्थक कार्यकर्त्यांनी (Activists) ठिकठिकाणी जल्लोषास प्रारंभ केला होता. यावेळी माजी उपमहापौर नीलेश आहेर (Former Deputy Mayor Nilesh Aher) जयराज बच्छाव, सुशांत गोसावी, यशपाल बागुल, रितेश गवळी, राहुल गायकवाड, यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या