Sunday, May 5, 2024
Homeदेश विदेशजुलैपर्यंत महागाई भत्ता ‘जैसे थे’

जुलैपर्यंत महागाई भत्ता ‘जैसे थे’

नवी दिल्ली –

करोना संकटामुळे केंद्रीय सरकारी कर्मचार्‍यांसह पेन्शन धारकांचा महागाई भत्ता येत्या 1 जुलै 2021 पर्यंत वाढवला जाणार नाही. त्यांना आता जुन्या दरानेच महागाई भत्ता मिळेल. सध्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 17 टक्के महागाई भत्ता मिळतो.

- Advertisement -

यापूर्वी केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी संसदेत घोषणा करत, 1 जुलै 2021 पासून महागाई भत्ता अपडेट होईल असे सांगितले होते. मात्र आता करोनामुळे सरकारने यामध्ये कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे.

1 जानेवारी 2020 पासून महागाई भत्त्यात वाढच केलेली नाही. इतकंच नाही तर सरकारने हे सुद्धा स्पष्ट केलं आहे की, 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 पर्यंत कोणतीही थकबाकी दिली जाणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या