Saturday, April 27, 2024
Homeनाशिकडी. एल. एड. साठी ३१ ऑगस्टपर्यंतच प्रवेश

डी. एल. एड. साठी ३१ ऑगस्टपर्यंतच प्रवेश

नाशिक | Nashik

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी डी. एल. एड. प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

- Advertisement -

प्रवेश प्रक्रियेची माहिती आणि सविस्तर नियमावली राज्य परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. डी. एल. एड. प्रवेशासाठी कला, वाणिज्य, विज्ञान, व्यावसायिक अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) इयत्ता बारावी शाखेतील विद्यार्थ्यांना खुल्या संवर्गासाठी किमान ४९.५ टक्के, तर खुला संवर्ग वगळून इतर प्रवर्गासाठी ४४.५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

व्यवस्थापन कोटयातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे. अर्ज भरण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. त्याशिवाय पडताळणीसाठी एक सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. संबंधित अध्यापक महाविद्यालयांनी व्यवस्थापन काेट्याची प्रवेश प्रक्रिया

१ ते २० सप्टेंबरपर्यंत करावी. २५ सप्टेंबरपासून प्रथम वर्ष सुरू केले जाणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी www.maa.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन परिषदेचे संचालक तथा राज्यस्तरीय डी. एल. एड प्रवेश सनिंयंत्रण समितीचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या