Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रसायरस मिस्त्रींवर वरळीतील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

सायरस मिस्त्रींवर वरळीतील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

मुंबई | Mumbai

टाटा सन्सचे (Tata Sons) माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा रविवारी मुंबईजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. काल रात्री अडीच ते तीनच्या सुमारास त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.

- Advertisement -

सायरस यांच्या कुटुंबातील एकही सदस्य सकाळी रुग्णालयात पोहोचू शकला नाही. सायरस यांचे कुटुंब परदेशात असल्याने ते आज रात्री मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. सायरस यांच्यावर उद्या मंगळवारी सकाळी १० वाजता वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मिस्त्री यांच्यासह केपीएमजी ग्लोबल स्ट्रेटेजी ग्रुपचे संचालक जहांगीर पंडोले यांचेही या अपघातात निधन झाले. अहमदाबाद-मुंबई महामार्गावर पालघरजवळील चारोटी गावाजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. अंत्यसंस्काराला सर्व क्षेत्रातील लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या