Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशCyclone Yaas - 'यास' चक्रीवादळाने धारण केलं अतिरौद्ररूप; जोरदार वाऱ्यासह पाऊस, पाहा...

Cyclone Yaas – ‘यास’ चक्रीवादळाने धारण केलं अतिरौद्ररूप; जोरदार वाऱ्यासह पाऊस, पाहा व्हिडिओ

दिल्ली | Delhi

यास चक्रीवादळ आता पुढच्या काही तासांत पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्याच्या किनारपट्टीवर धडकडणार आहे. या दोन्ही राज्यांमध्ये वादळाची पूर्वसूचना देणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. वादळी वाऱ्यासह या राज्यांध्ये पाऊसही सुरु झाला आहे.

- Advertisement -

ओडिसा जिल्ह्यातील बालासोर आणि भद्रक जिल्ह्यात प्रामुख्याने जोरदार वारा आणि पाऊस सुरु झाला आहे. तर पश्चिम बंगालमध्येही नॉर्थ २४ परगणा येथे अशिच स्थिती आहे. समुद्राचे पाणी दीघा शहरात शिरले आहे. त्यामुळे संभाव्य स्थिती विचारा घेता या दोन्ही राज्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाने सकाळी दिलेल्या माहितीनुसार हे वादळ ओडिशापासून धामरा बंदरावर ४० किमी अंतरापासून आणि बालासोरपासून दक्षिण पूर्व भागात ९० किमी अंतरावर होते. दुपारी २ च्या नंतर हे चक्रीवादळ ओडिशापासून पुढे जाणार आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. या दरम्यान हवेचा वेग हा १३० ते १४० किमी प्रति तास असण्याची शक्यता आहे.

ओडिशा व पश्चिम बंगालमध्ये ‘यास’ चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी आतापर्यंतची सर्वाधिक मदत पथके तैनात करण्यात येत आहेत. वादळग्रस्तांना मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची एकूण ११२ पथके पाच राज्ये व अंदमान निकोबार बेटांवर तैनात करण्यात येणार आहेत.

ओडिशात ५२ पथके तैनात केली जाणार असून ४५ पश्चिम बंगालमध्ये तैनात केली जातील. काही पथके आंध्र प्रदेश, तमिळनाडू, झारखंड, अंदमान निकोबार येथे तैनात करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक एस.एन. प्रधान यांनी सांगितले की, ओडिशा व पश्चिम बंगाल या राज्यांसाठी सर्वाधिक पथकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या