Friday, April 26, 2024
HomeनगरVideo : 'तौत्के' वादळाने आंबा पिकाचे मोठे नुकसान

Video : ‘तौत्के’ वादळाने आंबा पिकाचे मोठे नुकसान

लोणी (वार्ताहर)

राहाता तालुक्यातील प्रवरा परिसरात तौत्के वादळाने आंबा पिकाचे प्रचंड नुकसान झाले. हे वादळ नगर जिल्ह्यापासून शेकडो किलोमीटर वरून गुजरातकडे मार्गस्थ झाले असले तरी वादळाने अनेक जिल्ह्यात नुकसान केले.

- Advertisement -

प्रवरा परिसरातील चाळीस गावांमध्ये रविवार आणि सोमवार दोन दिवस सोसाट्याच्या वाऱ्याने आंबा पिकाचे नुकसान केले, झाडांच्या कैऱ्यांचा सडा पडल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर झालेच पण आंब्याचे भाव आता उच्चांक गाठणार असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला आर्थिक झळ बसणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या