Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रनिसर्ग चक्रीवादळाची तीव्रता अधिक; काळजी घ्या – मुख्यमंत्री

निसर्ग चक्रीवादळाची तीव्रता अधिक; काळजी घ्या – मुख्यमंत्री

सार्वमत

मुंबई – महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर यापूर्वी वादळं येऊन गेली. पण हे नुसतं वादळ नसून चक्रीवादळ आहे. या चक्रीवादळाची तीव्रता अधिक आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. आपल्यावर करोनाचे संकट आले. त्याचा सामना आपण धैर्याने केला. आता या निसर्ग वादळाचाही धैर्याने सामना करू. योग्य काळजी घेतल्यास आपण या संकटातून सुखरुप बाहेर पडू. वादळाच्या काळात आणि वादळानंतर अनावश्यक विजेची उपकरणं वापरू नका. तुमच्याकडील बॅटरी चार्ज करून घ्या, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी फेसबुक लाइव्ह वरून जनतेशी संवाद साधला.
ते म्हणाले, निसर्ग चक्रीवादाळाचा धोका मोठा आहे. हे वादळ उद्या धडकणार आहे. यामुळे पुढचे दोन दिवस उद्या आणि परवा नागरिकांनी घराबाहेर पडू नये,
निसर्ग चक्रीवादळात वार्‍याचा वेग ताशी 100 किलोमीटर पेक्षा अधिक असणार आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये. सुरक्षित ठिकाणी रहावे. मोडकळीस आलेल्या इमारतींपासून आणि विजेच्या तुटलेल्या तारांपासून दूर राहा. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा, निसर्ग वादळाचा मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, ठाणे आणि नाशिक या जिल्ह्यांना धोका आहे. या ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही यासंदर्भात चर्चा झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज आहे. एनडीआरएफच्या तुकड्या तैनात केल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या