Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशMandous Cyclone : 'मंदोस'चे तामिळनाडू, आंध्रात थैमान

Mandous Cyclone : ‘मंदोस’चे तामिळनाडू, आंध्रात थैमान

दिल्ली | Delhi

दक्षिणेतील काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरातून उठणाऱ्या मंदोस चक्रीवादळ थैमान घालण्यास सुरूवात झाली आहे.

- Advertisement -

बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राचे ६ डिसेंबरला खोल दाबात रुपांतर झाले होते. हे वादळ बुधवारी चेन्नईपासून ७५० किमी दूर होते. त्याआधीच प्रशासनाने सुरक्षिततेची आवश्यक ती खबरदारी घेण्यास सुरूवात केली होती. आता हे वादळ शुक्रवारी रात्री उशिरा मामल्लापुराजवळ धडकले, ज्यामुळे राज्यामध्ये अनेक भागात जोरदार पाऊस झाला.

मंदोस चक्रीवादळाने तामिळनाडूमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यात जोरदार वारा आणि वादळासह अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. खराब हवामानामुळे शुक्रवारी सुमारे १६ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. याबद्दलची माहिती देताना चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळाने ट्विट करत १३ देशांतर्गत आणि ३ आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आल्याची माहिती दिली.

येत्या काही तासांत मंदोस चक्रीवादळात कमकुवत होईल, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तत्पूर्वी, मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याचा IMD चा इशारा लक्षात घेता, तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.

मंदोस चक्रीवादळामुळे चेन्नई आणि कुड्डालोरसह १६ जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या