Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकअवघ्या ३७ दिवसांत 'त्यांनी' केला ६ हजार किमी सायकल प्रवास

अवघ्या ३७ दिवसांत ‘त्यांनी’ केला ६ हजार किमी सायकल प्रवास

करंजी खुर्द | Karanji Khurd

नाशिक जिल्ह्यातील निफाड व सिन्नर तालुक्यातील दोन सायकलिस्ट नाशिक ते लेह लदाख व लेह ते नाशिक असा 6 हजार किलोमीटरचा विक्रमी प्रवास सायकलवर ३७ दिवसात पूर्ण केला…

- Advertisement -

हा महाविक्रम सागर गुंजाळ व वैभव शिंदे या दोन तरुणांनी पहिल्यांदाच करून दाखवला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी या सायकलिस्टचा सत्कार करत अभिनंदन केले.

हा प्रवास करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सायकलिस्टशी संपर्क साधला आणि मदत लागल्यास संपर्क साधा, असे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांना पुढील उदरनिर्वाह करण्यासाठी मदत जाहीर केली.

Video : सप्तशृंगी घाटात दरड कोसळली

दरम्यान, सायकलिस्टचे तामसवाडी येथे फटाके फोडून स्वागत करण्यात आले. तर ग्रामस्थांच्या वतीने सत्कारही करण्यात आला

- Advertisment -

ताज्या बातम्या