Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकसिन्नर ते पंढरपूर सायकलवारीचे प्रस्थान

सिन्नर ते पंढरपूर सायकलवारीचे प्रस्थान

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

सिन्नर सायकलिस्टच्या (Sinnar Cyclists) सिन्नर ते पंढरपूर सायकलवारीने ( Sinnar To Pandhrpur Cycle Wari )काल बसस्थानकापासून पंढरपूरकडे प्रस्थान केले. लेफ्टनंट अनिकेत चव्हाणके व महिला आयपीएल खेळाडू माया सोनवणे यांनी या वारीला हिरवा झेंडा दाखवला.

- Advertisement -

यावेळी माजी नगराध्यक्ष किरण डगळे, किरण भंडारी, नीलेश गावंड, कैलास क्षत्रिय, डॉ. दिलीप गुरुळे, चंदन देशमुख, मंगेश आहेर, रोटरी क्लब, सिन्नर कॉलेज रनर गु्रप, स्वीमिंग गु्रप, वनप्रस्थ फाऊंडेशन, गोंदेश्वर फिटनेस क्लब, ढग्या डोंगर गु्रप यांच्यासह सायकलप्रेमी, नागरिक उपस्थित होते.

दरवर्षी सिन्नर सायकलिस्टचे सभासद नासिक सायकलिस्टसोबत पंढरपूर वारीला जात होते. मात्र, यंदा सिन्नरकरांतर्फे स्वतंत्र वारीचे नियोजन करण्यात आले. पहिल्याच वर्षी 75 सायकलिस्ट यात सहभागी झाले आहेत. ही वारी सिन्नर-आळेफाटा-शिरूर-टेंभुर्णी-पंढरपूरमार्गे जाणार आहे.

काल (दि.1) सिन्नर ते शिरूर 153 , शनिवारी (दि.2) शिरूर ते टेभुर्णी 157 कि.मी. व रविवारी (दि.3) टेंभुर्णी ते पंढरपूर 40 कि.मी. असे तीन दिवसांत 350 कि.मी.चा प्रवास करून ही वारी पंढरपूरला पोहोचणार आहे. वारीच्या यशस्वीतेसाठी सिन्नर सायकलिस्टचे अध्यक्ष नितीन जाधव, डॉ. संदीप मोरे, संदीप ठोक, मुकेश चव्हाणके, उदय गायकवाड, रामभाऊ लोणारे, भास्कर गोजरे, सुभाष कुंभार, शिवाजी लोंढे, संतोष खर्डे, अमोल भगत, सुभाष कुंभार परिश्रम घेत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या