Thursday, April 25, 2024
Homeनगरमाळरानावरील सीताफळाची बाजाराला गोडी

माळरानावरील सीताफळाची बाजाराला गोडी

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-

ऐन थंडीच्या दिवसात येणारी सीताफळे बाजारात दाखल झाली आहेत. दमदार पावसामुळे यंदा सीताफळाच्या झाडांना चांगलाच बहर आला आहे.

- Advertisement -

येथील किरकोळ विक्रेत्यांकडे चांगल्या प्रतीच्या सीताफळास चांगल्या प्रकारे भाव मिळत आहे. माळरानावर लागलेल्या सिताफळांना अधिक गोडी असून या हंगामात कच्च्या फळांना चांगलीच मागणी वाढली आहे.

सर्वच स्तरातील लोकांमध्ये आवडीच्या असलेला या रानमेव्याची आवक बोचर्‍या थंडीत वाढत आहे. जिल्ह्यात व तालुक्यात सीताफळाची झाडे बर्यापैकी आहेत. परिसरातील शेतकरी, शेतमजुर दरवर्षी विक्रीसाठी बाजारात सीताफळे आणतात. त्यातून अनेकांना चांगले उत्पन्न मिळते.

तालुक्यात सीताफळाचे आवर्जून उत्पन्न घेणारे शेतकरी कमीच आहे. मागील वर्षाच्या काळात दुष्काळामुळे झाडांच्या संख्येत घट झाली होती. परंतु यंदा जूनच्या सुरुवातीपासूनच चांगल्या पर्जन्यमानामुळे सीताफळाची झाडेही मोहरली आहेत. उपयुक्त हवामानामुळे यंदा झाडांना मोठ्या प्रमाणात फळे लगडली आहेत. बीड, शेवगाव, पाथर्डी अशा भागातून ही सीताफळे येत आहेत.

शेतजमिनीमध्ये उत्पादित केलेल्या सीताफळापेक्षा माळरानावर नैसर्गिकरीत्या लगडलेल्या सीताफळाला अधिक गोडी आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ सीताफळाची चव चाखण्यासाठी आतुर असतात. पिकण्या आगोदर काढलेली फळे साधारण चार दिवसात पिकतात. मशागती शिवाय फळे हातात येत असल्याने उत्पादकांना आणि मजुरांनाही त्याची किंमत वाटत नाही.

बीड, शेवगाव, पाथर्डी तालुक्यात महिला, शाळकरी मुले सीताफळे तोडून विक्रीस आणतात. त्यांना यातून चांगला रोजगार सहज मिळतो. सिताफळाच्या वाढीपासून ते पिकविण्यापर्यंत कोणत्याही रासायनिक प्रक्रियेचा अवलंब होत नसल्याने सीताफळाची ग्राहकडून आवर्जून खरेदी होते.

शिक्षणासाठी अथवा नोकरीसाठी परगावी असलेली मंडळी दिवाळीच्या निमित्ताने घरी परतल्यामुळे आणि करोनाच्या या भयाण संकटाच्या काळात आरोग्याच्या दृष्टीने घाऊक प्रमाणात सीताफळाची खरेदी करून त्याचा सामूहिक आस्वाद घेत आहेत.

कच्चा सीताफळांना परिपक्वतेस किमान दोन दिवसाच्या कालावधीमुळे कच्चा सिताफळांनाही खवय्यांकडून पसंती मिळत आहे. दरम्यान कच्चा सीताफळांची कॅरेट, डालीवर विक्री होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या