Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकइंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेस १५ मेपर्यंत बंद

इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेस १५ मेपर्यंत बंद

नाशिकरोड । Nashik

करोनाची महामारी अद्यापही कमी होत नसल्यामुळे राज्य शासनाने लॉकडाउनचा कालावधी २५ मे पर्यंत वाढविल्यानंतर येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेस 1 ते 15 मेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी दिली.

- Advertisement -

करोना महामारी मुळे दि. १६ ते ३० एप्रिल पर्यंत दोन्ही प्रेस बंद ठेवण्यात आले होते. परंतु अद्यापही करोनाचा प्रभाव कमी होत नसल्यामुळे दि. ०१ ते १५ मे पर्यंत दोन्ही प्रेस बंद राहणार आहेत. मात्र अत्यावश्यक काम सुरू राहील.

करोनामुळे प्रेस कामगारांना त्रास होऊ नये, म्हणून दोन्ही प्रेस १५ मे पर्यंत बंद ठेवावे, अशी मागणी एका पत्राद्वारे मजदूर संघाने दोन्ही प्रेसच्या महाप्रबंधक यांच्याकडे केली होती. त्यांनी ही मागणी मान्य केली असल्याची माहिती गोडसे व जुंद्रे यांनी दिली.

परिणामी कामगारांनी घरातच राहावे व स्वतःचे आरोग्य जपावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या