Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिकमध्ये आजपासून जमावबंदी; हे आहे कारण...

नाशिकमध्ये आजपासून जमावबंदी; हे आहे कारण…

नाशिक | प्रतिनिधी

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. 10 ते 24 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे. याबाबतची माहिती विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी दिली आहे. एक पत्रक काढून त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे…

- Advertisement -

शहरात विविध मागण्यांसाठी राजकीय पक्ष, संघटना, मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे, उपोषण यांसारखे आंदोलन आयोजित करतात.

तसेच मनपाच्या वतीने ठिकठिकाणी, अनधिकृत अतिक्रमण हटविताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते, तसेच वाढदिवस, पुण्यतिथी, जयंती तसेच इतर काही कारणांमुळे होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

यासोबतच शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हातील शेतकरी व औद्योगिक क्षेत्रातील कामगार हे मोठ्या प्रमाणावर निदर्शने व आंदोलनाची शक्यता लक्षात घेऊन

कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. 10 ते 24 फेब्रुवारी रोजी रात्री 12 पर्यंत 15 दिवसांकरिता महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 1951 चे कलम 37 (1) (3) नुसार जमावबंदी आदेश जारी करण्यात आल्याचे या पत्रकात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या