Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशकात दोघांवर संचारबंदीचा गुन्हा

नाशकात दोघांवर संचारबंदीचा गुन्हा

नाशिक | Nashik

संचारबंदीचे आदेशाचे उल्लंघन करत मध्यरात्रीच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत फिरणार्‍यांविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

राहूल अंबादास हांडगे (रा. राणेनगर), मयूर भालचंद्र अग्रवाल (रा. कॉलेजरोड) अशी संशयितांची नावे आहेत.

करोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहरात रात्री 11 ते सकाळी 6 यावेळेत संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. या आदेशाचा भंग करत 31 डिसेंबरच्या रात्री सव्वादोन वाजेच्या सुमारास दोघे संशयित पिनॅकल मॉल परिसरात मद्यधुंद अवस्थेत आढळून आले.

त्यामुळे पोलीस शिपाई अनिल किसन आव्हाड यांनी त्यांच्याविरोधात फिर्याद दिली असून हवालदार आर. व्ही. सोनार तपास करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या